वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर तिचा प्रियकर आफताब पूनावाला याला अटक करण्यात आली आहे. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्यानंतर दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत त्यांची विल्हेवाट लावली होती. पोलिसांनी आफताबला अटक केली असून जेलमध्येही त्याच्यावर २४ तास पाळत ठेवली जात आहे. या घटनेनंतर दोघांचीही सोशल मीडिया अकाऊंट्स चर्चेत आहेत.

PHOTOS: मुंडकं कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आफताब रोज श्रद्धाचा चेहरा पाहायचा, धक्कादायक खुलासे ऐकून पोलीसही चक्रावले

Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..
Girls intimate Holi Celebration Inside Delhi Metro
“अंग लगा दे रे, मोहे रंग…”, मेट्रोमध्ये तरुणींच्या अश्लील डान्समुळे ओशाळले प्रवासी! Viral Video पाहून संतापले नेटकरी
minor girl kidnapped from chhattisgarh rape by railway head constable
इन्स्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेपाळहून एकटीच आली; पण प्रियकराने मुंब्र्यात…

आफताबचं इन्स्टाग्रामवर फूड ब्लॉग अकाऊंट होतं. त्याचे २८ हजार फॉलोअर्स होते. दरम्यान, श्रद्धा मात्र इन्स्टाग्रामवर फार सक्रीय नव्हती. तिचे २७०० फॉलोअर्स होते. तिच्या पोस्टमध्ये भटकंतीचे तसंच स्वत:चे फोटो दिसत आहेत. हत्येच्या एक आठवडाआधी तिने हिमाचल प्रदेशातील आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती पुस्तक वाचताना दिसत आहे. ११ मे रोजी पोस्ट केलेल्या या फोटोला तिने ‘Exploring more and more every passing day’ अशी कॅप्शन दिली आहे.

Shraddha Murder Case: तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण…; मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचा पोलिसांकडे धक्कादायक खुलासा

दरम्यान हत्येच्या १० दिवस आधी श्रद्धाने गंगेच्या किनारी बसलेली एक इन्स्टाग्राम रील पोस्ट केली होती. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन तिला भटकंतीची तसंच नवीन ठिकाणं शोधण्याची फार आवड होती हे दिसत आहे.

मुंबईतून दिल्लीला राहायला गेल्यानंतर श्रद्धाने फक्त दोनच पोस्ट शेअर केल्या होत्या. १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’ला तिने आफताबसोबत फोटो शेअर केला होता. ‘Happy days’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिल होतं. आफताबसोबत तिने हा एकमेव फोटो शेअर केला आहे.

दरम्यान श्रद्धाचा खून केल्यानंतर कोणालाही संशय येऊ नये यासाठी आफताब तिचं सोशल मीडिया अकऊंट वापरत होता. १८ मे रोजी तिचा गळा दाबून खून केल्यानंतर जवळपास एक महिना तो तिच्या अकाऊंटवरुन पोस्ट करत होता. तसंच ती अद्याप जिवंत आहे हे दाखवण्यासाठी ९ जूनपर्यंत तिच्या मित्रांसोबत चॅटही करत होता.