Delhi Murder: पीडित कुटंबाला भेटण्यासाठी गेलेल्या केजरीवालांना विरोध; भाषणादरम्यान मंचावरून पडले खाली

दिल्लीत एका ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली

Opposition to Kejriwal who had gone to visit the victim family
भाजपा आणि आप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू

दिल्लीत एका ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दिल्लीत संताप व्यक्त होत असून, सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर पीडितेवर आईवडिलांच्या संमतीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राजकारण तापू लागलं आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पीडित कुटुंबाला भेटायला आले, तेव्हा त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले.

अरविंद केजरीवाल यांनी विरोधाचा सामना करत पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री तेथील एका स्टेजवर पोहचले. मात्र, गर्दीमुळे ते स्टेजवरून खाली पडले. त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांभाळले. त्यानंतर अरविंद केजरीवाल कारमध्ये बसून निघून गेले.

हेही वाचा- दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण : “राहुल गांधी न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत असेन”

या घटनेवरून भाजपा आणि आप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाली आहे. आम आदमी पार्टीचे लोक तेथील वातावरण बिघडवत आहेत, असे दिल्ली भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी म्हटले आहे. त्याचवेळी आपच्या आमदार राखी बिडलान यांनी भाजपाचे लोक तिथले वातावरण बिघडवत असल्याचा आरोप केला.

पीडितेच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत

दिल्ली सरकारने पीडितेच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यासह, आता या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी केली जाईल. अरविंद केजरीवाल म्हणाले की, “सरकारकडून मोठे वकील लावले जातील. जेणेकरून दोषींना कठोर शिक्षा मिळू शकेल. केंद्र सरकारने दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर पावले उचलावीत, आम्ही पूर्ण सहकार्य करू.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delhi murder opposition to cm kejriwal who had gone to visit the victim family fell off the stage during the speech srk

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या