Whatsapp हॅक करून लाखोंची फसवणूक; राजधानी दिल्लीतील प्रकारामुळे युजर्सची चिंता वाढली!

दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एका विदेशी नागरिकाला अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाने Whatsapp हॅक करणाऱ्या एका विदेशी नागरिकाला अटक केली आहे. याची टोळी लॅपटॉपमधल्या एका ऍप्लिकेशनच्या मदतीने लोकांचे Whatsapp अकाऊंट हॅक करायची. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मोबाइलमधले मेसेज आणि संपर्क आरोपीच्या लॅपटॉपमध्ये यायचे.

हॅक केल्यानंतर ही गँग त्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांशी संपर्क साधायची आणि त्यांच्याकडे पैसे मागायची. त्यामुळे त्या लोकांना वाटायचं की आपला मित्र किंवा नातेवाईकच आपल्याकडे पैसे मागत आहेत. अशा प्रकारे कॉन्टॅक्टमधल्या इतर लोकांची Whatsapp हॅक करुन ही टोळी त्यांनाही लुटत होती.

दिल्ली सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पी.एस. मल्होत्रा यांनी सांगितलं की, Whatsapp हॅक करणारी ही टोळी दिल्ली आणि बंगळुरुमधून काम करत होती. या प्रकरणी पोलिसांनी विदेशी नागरिक असलेल्या चिमेलून इम्मानुएल याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक लॅपटॉप आणि १५ मोबाइल फोन जप्त केले आहे. दिल्ली सायबर सेल सध्या दिल्ली आणि बंगळुरुमधल्या काही भागांमध्ये छापे टाकत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delhi police busts whatsapp hacking gang foreigners arrested vsk

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या