पीटीआय, नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ताब्यात घेतलेले नसून ते स्वत: आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले, असा खुलासा नवी दिल्लीतील आर. के. पूरम पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल

सत्यपालक मलिक यांना नवी दिल्लीतील पोलिसांनी ताब्यात घेतले, असे वृत्त समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी खुलासा केला. ‘‘हे वृत्त म्हणजे केवळ अफवा आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ताब्यात घेतलेले नाही. ते स्वत:च्या इच्छेने, त्यांच्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले आणि आम्ही त्यांना सांगितले की, ते स्वत:च्या इच्छेने जाऊ शकतात,’’ असे पोलीस उपायुक्त (नैऋत्य) मनोज सी. यांनी सांगितले.
आर. के. पूरममधील एमसीडी पार्कमध्ये एक बैठक होणार होती आणि मलिक त्यात सहभागी होणार होते. हे बैठक घेण्याचे ठिकाण नाही आणि या बैठकीबाबत कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही याबाबत मलिक यांना कळविले होते. त्यानंतर मलिक आणि त्यांच्या समर्थकांनी ते ठिकाण सोडले आणि ते पोलीस ठाण्यात आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.