बलात्कार पीडितांवरील वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलीस रविवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या घरी दाखल झाले. विशेष पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांना राहुल गांधी भेटले. तब्बल दोन तास त्यांच्या विविध प्रश्नांना राहुल गांधी यांनी उत्तरं दिली. आयुक्त म्हणाले की, “आम्ही राहुल गांधी यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माहिती मागितली. राहुल यांनी थोडा वेळ मागितला आहे आणि म्हणाले की, मी लवकरच माहिती देईन.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष पोलीस आयुक्त हुड्डा म्हणाले की, “राहुल यांनी सांगितलं की भारत जोडो यात्रेदरम्यान ते अनेक लोकांना भेटले. त्यानंतर त्यांनी ते वक्तव्य केलं होतं. सर्व माहिती जोडायला थोडा वेळ लागेल. आवश्यकता असल्यास आम्ही राहुल गांधी यांची पुन्हा चौकशी करू.”

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये एका सभेत म्हणाले की, “अनेक महिला मला भेटायला आल्या होत्या, त्या रडत होत्या, खूप दुःखी होत्या. त्यापैकी काही महिला म्हणाल्या की, त्यांच्यावर बलात्कार झाला आहे, त्यांचं लैंगिक शोषण झालं आहे. मी त्यांना म्हणालो की, मी पोलिसांना याबद्दल सांगू का. त्यावर त्या महिला म्हणाल्या की, राहुलजी ही गोष्ट आम्हाला केवळ तुम्हाला सांगायची होती. पोलिसांना याबद्दल सांगू नका. अन्यथा आम्हाला अधिक नुकसान सहन करावं लागेल.”

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर पोलिसांचं एक पथक १५ मार्च रोजी राहुल गांधी यांच्या घरी गेलं होतं. पथकाने तीन तास वाट पाहिली. परंतु राहुल भेटले नाहीत. १६ मार्च रोजी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी पुन्हा एकदा राहुल यांच्या घरी गेले. त्यांनीदेखील दीड तास वाट पाहिली. त्यानंतर राहुल यांच्याशी पोलीस अधिकाऱ्यांची भेट झाली. त्यानंतर राहुल यांनी नोटीस स्वीकारली. त्यानंतर काँग्रेसने सांगितलं की, “योग्य वेळी कायद्याने नोटीशीचं उत्तर दिलं जाईल.

हे ही वाचा >> “पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय…” रामदास कदमांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले, “ज्याला…”

४५ दिवसांनंतर चौकशी

काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, दिल्ली पोलिसांना महिलांची इतकी काळजी आहे तर ते फेब्रुवारी महिन्यात राहुल यांच्याकडे का गेले नाहीत. भारत जोडो यात्रा संपून ४५ दिवसांनंतर चौकशी केली जात आहे. राहुल गांधी यांची लीगल टीम याला कायदेशीर उत्तर देईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi police reaches rahul gandhi residence for remark on rape victim in bharat jodo yatra asc
First published on: 19-03-2023 at 13:50 IST