scorecardresearch

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेले शस्त्र सापडले ; दिल्ली पोलीस दलातील सूत्रांचा दावा

पूनावाला याने श्रद्धाचा गळा आवळून हत्या केल्याचा आणि त्यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचा आरोप आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेले शस्त्र सापडले ; दिल्ली पोलीस दलातील सूत्रांचा दावा
आफताबने श्रद्धाची हत्या का केली याचं कारणही पोलिसांनी चार्जशीटमध्ये लिहिलं आहे

नवी दिल्ली : आफताब पूनावाला याने श्रद्धा वालकर हिचा कथितरीत्या खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे  करण्यासाठी वापरलेले शस्त्र दिल्ली पोलिसांनी हस्तगत केले आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली. पोलिसांना अद्याप श्रद्धाचे डोके आणि अन्य काही अवयय मिळालेले नाहीत.

श्रद्धी आणि आफताब यांच्यात लिव्ह इन संबंध होते. २७ वर्षीय श्रद्धाची एक अंगठीही पोलिसांनी हस्तगत केली आहे. ही अंगठी आफताबने अन्य एका महिलेला दिली होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

रोहिणी येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीचे पुढील सत्र सुरू आहे. त्यासाठी तो तेथे सोमवारी सकाळी ९.३० वाजता पोहोचला. हे सत्र सकाळी ११ वाजता सुरू झाले.

पूनावाला याने श्रद्धाचा गळा आवळून हत्या केल्याचा आणि त्यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचा आरोप आहे. हे तुकडे त्याने दक्षिण दिल्लीच्या मेहरौली भागातील आपल्या घरात ३०० लिटर क्षमतेच्या फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर त्याने शहराच्या विविध भागांत या तुकडय़ांची विल्हेवाट लावली, असा आरोप आहे. याप्रकरणी त्याला १२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. प्रारंभीच्या पोलीस कोठडीनंतर सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 02:56 IST

संबंधित बातम्या