किरण बेदींच्या कार्यालयावर हल्ला!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या कार्यालयाची सोमवारी तोडफोड करण्यात आली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या कार्यालयाची सोमवारी तोडफोड करण्यात आली. वकिलांच्या एका गटाकडून ही तोडफोड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. हल्याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.
दरम्यान, हल्लेखोरांची वकिल घोषणाबाजी करत थेट किरण बेदी यांच्या कृष्णानगर मतदार संघातील कार्यालयात घुसले आणि थेट तोडफोडीला सुरूवात केल्याचे उपस्थित भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर, खुद्ध किरण बेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हल्ल्याबद्दलच्या वृत्ताला दुजोरा दिला असून यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील वकिल आणि किरण बेदी यांच्यात वाद सुरू आहे. बेदी पोलिस उपायुक्त असतानाच्या काळात दिल्ली न्यायालयाबाहेर आंदोलन करणाऱया वकिलांवर लाठीमार झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delhi polls bjps cm candidate kiran bedis office in krishna nagar ransacked