शीला दीक्षित यांच्याविरोधात भाजपकडून विजेंद्र गुप्ता

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ६२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरोधात माजी

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ६२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरोधात माजी प्रदेशाध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने तीन विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. राजौरी गार्डन, शाहदरा, कालकाजी व हरि नगर मतदारसंघ भाजपने  अकाली दलासाठी सोडले आहेत.
काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता पाहत सर्व इच्छूक उमेदवारांना मंगळवारीच निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय सांगण्यात आला होता.तीन नेत्यांच्या मुलांना पक्षाने संधी दिली आहे. यात विजयकुमार मल्होत्रा यांचा मुलगा  यांचे पुत्र अजय तसेच माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचा मुलगा प्रवेश यांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delhi polls bjps vijender gupta to take on sheila dikshit

ताज्या बातम्या