दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाला. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ह्युंदाई I 20 कारमध्ये हा स्फोट झाला. या घटनेतील जखमींना जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेतील मृतांची आणि जखमींची नावं समोर आली आहेत.

दिल्ली स्फोटातील मृत आणि जखमींची यादी

१) शायना परवीन (जखमी)
२) हर्षुल सेठी (जखमी)
३) शिवा जायसवाल (जखमी)
४) समीर (जखमी)
५) जोगिंदर (जखमी)
६) भवानी शंकर सहरमा (जखमी)
७) अज्ञात (मृत)
८) गीता (जखमी)
९) विनय पाठक (जखमी)
१०) पप्पू (जखमी)
११) विनोद सिंह (जखमी)
१२) शिवम झा (जखमी)
१३) अज्ञात (जखमी)
१४) मोहम्मद शहनवाज (जखमी)
१५) अंकुश शर्मा (जखमी)
१६) अशोक कुमार (मृत)
१७) अज्ञात (मृत)
१८) मोहम्मद फारुख (जखमी)
१९) तिलकराज (जखमी)
२०) अज्ञात (जखमी)
२१ ) अज्ञात (मृत)
२२) अज्ञात (मृत)
२३) अज्ञात (मृत)
२४) मोहम्मद सफवान (जखमी)
२५) अज्ञात (मृत)
२६) मोहम्मद दाऊद (जखमी)
२७) किशोरीलाल (जखमी)
२८) आझाद (जखमी)

अशी यादी समोर आली आहे. दरम्यान या घटनेत आत्तापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती ANI ने दिली आहे. तसंच मृतांची संख्या वाढण्याची चिन्हं आहेत. सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. दरम्यान अग्निशमन दलाच्या सुमारे सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसंच मदत आणि बचावकार्य तातडीने सुरु करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

“आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची बातमी खूपच दुःखद आणि चिंताजनक आहे. या दुःखद अपघातात अनेक निष्पाप जीव गमावल्याने दुःख झालं आहे. या दुःखद काळात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबांबरोबर मी आहे आणि माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी मी आशा करतो”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.