scorecardresearch

Premium

VIDEO : भिंतीला भगदाड पाडून चोर शोरूममध्ये घुसले, तब्बल २५ कोटींचे दागिने लंपास

शोरूमच्या मालकांनी सांगितलं की शोरूममध्ये तब्बल २० ते २५ कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते.

delhi robbery
दिल्लीच्या जंगपुरा भागात एका ज्वेलर्समध्ये मोठी चोरी झाली आहे. (PC : ANI)

राजधानी दिल्लीत एका ज्वेलर्समध्ये कोट्यवधींची चोरी झाली आहे. शोरूमच्या मालकाने पोलीस तक्रारीत म्हटल्याप्रमाणे त्याच्या शोरूममधून तब्बल २० ते २५ कोटी रुपयांच्या सोन्याच्या आणि हिरेजडीत दागिन्यांची चोरी झाली आहे. हे शोरूम दिल्लीतल्या जंगपुरा परिसरात असून उमराव सिंह ज्वेलर्स असं या शोरूमचं नाव आहे. सोमवारी शोरूम बंद असताना चोरांनी शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला आणि शोरूममधील कोट्यवधी रुपयांचे दागिने पळवले.

दिल्लीतल्या जंगपुरा येथील बाजार सोमवारी बंद असतो. परिसरातील जवळपास सर्वच दुकानांना सोमवारी कुलूप असतं. शोरूम मालक आणि कर्मचाऱ्यांनी रविवारी (२४ सप्टेंबर) रात्री शोरूम व्यवस्थित बंद केलं होतं. परंतु, मगंळवारी सकाळी शोरूमचे मालक आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शोरूम उघडलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. रिकामं शोरूम बघून सगळ्यांनी डोकयाला हात लावला.

cash stolen by transgenders in pune, woman travelling in auto rickshaw
पुणे : रिक्षाप्रवासी महिलेच्या पिशवीतून रोकड चोरली, सेनापती बापट रस्त्यावरील घटना
Veg Thali Cost
व्हेज थाळी १७ टक्क्यांनी झाली स्वस्त, CRISIL ने सांगितले ‘हे’ कारण
Blood bank
मुंबई: सहा वर्षांत रक्तपेढ्यांनी रुग्णांची केली लूट
monu manesar arrested
VIDEO: दोन मुस्लीम युवकांच्या हत्येप्रकरणी मोनू मानेसरला अटक, साध्या वेशातील पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दरम्यान, शोरूमच्या मालकांनी सांगितलं की शोरूममध्ये तब्बल २० ते २५ कोटी रुपयांचे दागिने होते. शोरूममध्ये ठेवलेले सगळे दागिने चोरांनी लंपास केले आहेत. या चोरीची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आता चोरांचा तपास करत आहेत.

हे ही वाचा >> “ये डर अच्छा हैं”, एकनाथ शिंदेंचा परदेश दौरा पुढे ढकलल्यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले…

जंगपुरा मार्केटमधील ज्या इमारतीत उमराव सिंह ज्वेलर्स आहे, त्या इमारतीत इतरही अनेक दुकानं आणि शोरूम्स आहेत. इमारतीत वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या ज्वेलर्सला लागून आहेत. चोरांनी या पायऱ्यांजवळ भिंतीला भगदाड पाडलं आणि शोरूममध्ये प्रवेश केला. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस सीसीटीव्ही फूटेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delhi thieves steal rs 25 crore jewellery from jangpura showroom asc

First published on: 26-09-2023 at 14:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×