नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सुक्ष्म नियोजनाची रणनिती तयार केली असून २७ केंद्रीय नेत्यांकडे प्रत्येकी दोन मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. उर्वरित १६ मतदारसंघांमध्येही येत्या दोन-चार दिवसांमध्ये प्रभारी नियुक्त केले जातील. ५४ मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आलेल्या केंद्रीय नेत्यांमध्ये भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, पीयूष गोयल आदींचा समावेश आहे.

हरियाणा व महाराष्ट्राच्या धर्तीवर दिल्लीची निवडणूक लढवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. २०२०मध्ये भाजपला ३८ टक्के मते मिळाली होती, यावेळी किमान १० टक्के मते वाढवण्याचे लक्ष्य पक्षाने निश्चित केले आहे. महाराष्ट्रातही १० टक्के मते वाढवण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले होते.

Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
घरगड्यांच्या गर्दीत सामील भाजपाई
घरगड्यांच्या गर्दीत सामील भाजपाई
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप

दिल्लीतील मतदानासाठी अजून दोन आठवड्यांचा कालावधी असला तरी अजूनही निवडणूक आम आदमी पक्षाकडे झुकली असली असल्याचे मानले जात आहे. पण, ‘आप’च्या मतांची टक्केवारी ५४ वरून ४२-४१ टक्क्यांपर्यंत खाली आणली तर भाजपला मोठ्या जागा जिंकता येऊ शकतात. त्यादृष्टीने केंद्रीय नेत्यांना मतदारसंघांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्याची सूचना करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : केरळच्या महिलेला फाशीची शिक्षा

दिल्लीमध्ये सुमारे ३० लाख मूळचे उत्तराखंडचे रहिवासी असल्याने मुख्यमंत्री धामींच्या प्रचारसभांना महत्त्व दिले जात आहे. शिवाय, पंजाबी हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी तसेच, पूर्वांचली मतांसाठी चौधरींना प्रचारात उतरवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्लीतील भाजपच्या सर्व उमेदवारांची सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती. भाजपचे दिल्ली अध्यक्ष विरेंद्र सचदेवा व प्रभारी जय पांडा यांच्या उपस्थितीत प्रचाराची दिशा स्पष्ट करण्यात आल्याचे समजते. ८० वर्षांहून अधिक वयोगटातील मतदारांच्या मतांसाठी भाजपने स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. महाराष्ट्रामध्ये या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची पाच-पाच हजार मते प्रत्येक मतदारसंघात मिळाल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. तशीच यंत्रणा दिल्लीमध्ये राबवली जाणार आहे.

हेही वाचा : राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका

मुख्यमंत्र्यांकडे मोठी जबाबदारी

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांमध्येही मुख्यत्वे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अधिकाधिक प्रचारसभा घेतल्या जातील. याशिवाय मोहन यादव, पुष्कर धामी, नायबसिंह सैनी, देवेंद्र फडणवीस, भजनलाल शर्मा, हिंमत बिस्वा-शर्मा यांच्यासह बिहारचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांच्याही सभा घेतल्या जातील.

संघही सक्रिय

हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांप्रमाणे दिल्लीतही संघ सक्रिय झाला असून क्षेत्र व प्रांत स्तरावरील नेत्यांकडे मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये संघाचे बैठकांचे सत्र सुरू झाले असल्याचे समजते.

Story img Loader