सुधारित नागरिकत्व कायदा(सीएए)वरून काल राजधानी दिल्लीतील काही भागांमध्ये उफाळलेल्या हिंसचारातील मृत्यू झालेल्यांचा आकडा आता सातवर पोहचला आहे. शिवाय, आजही या हिंसाचाराची धग कायम असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी आज सकाळी देखील आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. तर, ब्रह्मपुरी भागात दगडफेकीची देखील घटना घडली.

सोमवारी दिवसभर घडलेल्या हिंसाचारात एका पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. त्यांनतर आता मृतांच्या संख्येत वाढ होवून हा आकडा सातवर पोहचला आहे. शिवाय, हा हिंसाचार अद्यापही पुर्णपणे थांबला नसल्याचे दिसत आहे. कारण, मंगळवारी सकाळी देखील वातावरण तणावपूर्ण होते. आंदोलकांकडून आज सकाळी पाच दुचाकी पेटवून देण्यात आल्या व दगडफेक देखील करण्यात आली.

आणखी वाचा – दिल्ली हिंसाचार: ‘तैनात केलेले ते जवान आमचे नाहीत’; भारतीय लष्कराचा धक्कादायक खुलासा

मौजपूरसह आसपासच्या भागातून आग लागल्याच्या घटनेची माहिती देण्यासाठी कालरात्रीपासून सकाळपर्यंत पोलिसांना ४५ फोन आले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या वाहनांवर देखील दगडफेक करण्यात आली. ज्यामध्ये तीन कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.