Crime News : गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यात सूटकेसमध्ये भरलेला एका २४ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी शुक्रवारी एका २९ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. हा व्यक्ती मृत महिलेचा मित्र असून त्याच्यावर महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सतेंद्र यादव असे असून तो दिल्लीतील विनोद नगर भागातील रहिवासी आहे. द कॅपिटल या खाजगी रियल इस्टेट कंपनीत तो काम करतो. पोलिसांनी दावा केला आहे की महिलेचे बँक पासबूक, आधार कार्ड, दोन मोबाईल फोन आणि एक कार यादव याच्याकडे सापडले आहे.
३० मे ऱीजी हापूर पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता, पिलखुवा पोलिस स्टेशन हद्दीतील शिखेडा गावातील एका कालव्याजवळ नीलेश नावाच्या या महिलेचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरलेल्या अवस्थेत सापडला होता.
ही महिला दिल्लीतील त्रिलोकपुरी येथील रहिवासी होती, असे पिलखुवा पोलीस ठाण्याचे एसएचओ पटनीश कुमार यांनी सांगितले. तसेच महिलेचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता आणि तिच्या शरीरावर गळा आवळल्याच्या खुणा देखील आढळल्या होत्या.
यादवने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की ते तीन वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होते. एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या नीलेशने त्यांच्या रिलेशनशिपदरम्यान यादवला ५.२५ लाख रुपये दिले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुमारास तिला किडनीच्या आजाराचे निदान झाले आणि तिला दिल्लीच्या धर्मशिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले .
यादव हा नीलेशला रुग्णालयात सतत भेटायचा, मात्र गेल्या वर्षी यादव पटियालाला जाऊन आल्यानंतर त्यांच्यात तणाव वाढला… आणि त्याला नीलेश ही दुसऱ्या कोणाततरी गुंतली असल्याचा संशय आला. त्याने दावा केला की तिचा फोन नेहमी व्यस्त लागत असे आणि फोन लॉक असल्याने त्याला हे तपासून बघता आले नाही, असे कुमार यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या मागितीनुसार, यादवने दावा केला की २८ मे रोजी नीलेश तिच्याकडून पैसे मागण्यासाठी त्याच्या खोलीवर आली होती. परंतु, पोलिसांनी सांगितले की, त्याचा राग अनावर झाला आणि त्याने तिच्या स्कार्फने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह त्याच्या खोलीत असलेल्या एका सूटकेसमध्ये भरला. त्याच रात्री गाडीने तो शिखेडा कॅनल रोडवर गेला, हा रोड तो टोल टाळण्यासाठी वारंवार वापरत असे आणि या रस्त्यावर त्याने सूटकेस फेकून दिली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
आम्ही गुन्ह्यात वापरलेली गाडी, कागदपत्रे, मोबाईल फोन आणि इतर पुरावे देखील जप्त केले आहेत. आरोपीने सांगितलेला घटनाक्रमाची सीसीटीव्ही फुटेजमधून देखील पुष्टी झाली आहे, असे हापूरचे एसपी कुंवर ज्ञानराज सिंह यांनी सांगितले. यादव याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असो पोलिसांनी सांगितले. तसेच लवकरच आरोपपत्रा दाखल केले जाईल असेही त्यांनी सांगितले.