scorecardresearch

दिल्लीत पुन्हा श्रद्धा वालकरप्रमाणे खून! पतीला संपवून मृतदेहाचे तुकडे ठेवले फ्रिजमध्ये

दिल्लीमधील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली.

दिल्लीत पुन्हा श्रद्धा वालकरप्रमाणे खून! पतीला संपवून मृतदेहाचे तुकडे ठेवले फ्रिजमध्ये
फोटो सौजन्य- एएनआय

दिल्लीमधील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. श्रद्धाला संपवण्यासाठी आरोपी आफताब अमीन पूनावालाने दाखवलेल्या क्रूरतेमुळे आश्चर्य व्यक्त केला जातोय. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दिल्लीमध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या मुलाला सोबत घेऊन आपल्या पतीचा खून केला आहे. आरोपी आफताबने श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे ज्या पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवले होते, अगदी तशाचा प्रकारे या महिलेनेदेखील तिच्या पतीचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते. दिल्ली पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमका प्रकार काय?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीमधील एका महिलेने मुलाला सोबत घेऊन आपल्या पतीची हत्या केली आहे. या महिलेचे नाव नाव पूनम तर मुलाचे नाव दीपक असे आहे. हत्या झालेल्या पुरूषाचे नाव अंजन दास असे आहे. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. महिलेने आपल्या पतीचा खून करून मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवून ठेवले. तसेच हे तुकडे पांडव नगर परिसरातील मैदानावर फेकून देऊन, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडालेली असताना ही घटना समोर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आफताब तिहार जेलमध्ये आत्महत्या करु शकतो?

दरम्यान, श्रद्धा वालकरचा निर्घृणपणे खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावाला याच्यावर जेलमध्ये पाळत ठेवण्यात येत आहे. आफताब सध्या तिहार जेलमध्ये बंद असून, तो आत्महत्या करु शकतो अशी भीती पोलिसांना आहे. आफताबला कोठडीतून बाहेर जायचं असेल तर कारागृहाचे दोन कर्मचारी सतत त्याच्यासह असणार आहेत. आफताबला २८, २९ नोव्हेंबर आणि २ डिसेंबरला चाचणीसाठी नेण्यात येणार आहे. नार्को चाचणीआधी आफताबची पॉलिग्राफ चाचणी केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 13:25 IST

संबंधित बातम्या