घरात सापडले एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतेदह

नवरा ई-रिक्षा चालक होता. चार ते पाच दिवसांपूर्वी या सर्वांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

दिल्लीच्या भजनपूरा भागात एका घरामध्ये पाच मृतदेह सापडले आहेत. हे सर्व मृतदेह एकाच कुटुंबातील सदस्यांचे असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून, जोडप्यासह त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

नवरा ई-रिक्षा चालक होता. चार ते पाच दिवसांपूर्वी या सर्वांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पोलिसांना सकाळी ११.३०च्या सुमारास घरातून दुर्गंधी येत असल्याचा फोन आला. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी पाचही मृतदेह जमिनीवर पडलेले होते.

हे सर्व मृतदेह खूप खराब स्थितीमध्ये असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. घटनास्थळावर कुठलीही चिठ्ठी सापडलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delhis bhajanpura home five bodys found dmp

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या