दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये एकट्या मुलीसह महिलांच्या समूहाला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मशीद प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे. मशीद परिसरात व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मशीद प्रशासनाचा हा निर्णय आक्रमक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटली आहे.

जामा मशिदीबाहेर महिलांच्या प्रवेशबंदीसंदर्भात नोटीस लावण्यात आली आहे

पाकिस्तानच्या ISI गुप्तचर यंत्रणेत काम केलेल्या अधिकाऱ्याच्या हाती लष्कराची धुरा; बाजवांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची घोषणा

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलीवाल यांनी या आदेशाचा निषेध नोंदवला आहे. “जामा मशिदीमध्ये महिलांना प्रवेशबंदी चुकीची आहे. यासंदर्भात मशिदीच्या इमामांना महिला आयोग नोटीस बजावत आहे. महिलांना प्रवेश नाकारण्याचा कोणालाही अधिकार नाही”, अशी प्रतिक्रिया मलीवाल यांनी ट्वीट करत दिली आहे.

“राज्यपालांनी सगळ्या मर्यादा सोडल्या”; शिवरायांबद्दलच्या विधानावरुन पवारांचा संताप! म्हणाले, “अशा व्यक्तीला…”

मशिदीचे जनसंपर्क अधिकारी सबीउल्लाह खान यांनी या आदेशाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “जेव्हा महिला एकट्या येतात तेव्हा धार्मिक स्थळावर अयोग्य कृत्य झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी ही प्रवेशबंदी करण्यात आली आहे”, असे खान यांनी सांगितले आहे. “महिलांना मशिदीत प्रवेशबंदी करण्यात आलेली नाही. जेव्हा महिला एकट्या येतात तेव्हा परिसरात गैरप्रकार घडतात. व्हिडीओ रेकॉर्ड केले जातात. मशिदीत येणाऱ्या कुटुंबांवर अथवा विवाहित दाम्पत्यांवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही”, असे खान यांनी म्हटले आहे.