सध्याच्या घडीला देशात राम मंदिराचा प्रचंड गाजतो आहे. अशात भाजपाचे खासदार साक्षी महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जामा मशीद पाडा, तिथे मूर्ती आढळल्या नाहीत तर मला खुशाल फासावर लटकवा असे साक्षी महाराजांनी म्हटलं आहे. उन्नाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात साक्षी महाराजांनी यांनी हे वक्तव्य केले आहे.

राम मंदिराच्या निर्मितीवरूनही साक्षी महाराजांनी सुप्रीम कोर्टावरही टीका केली आहे. काहीही झाले तरीही २०१९ च्या निवडणुकांच्या आधी राम मंदिराचे काम सुरु करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराबाबत घेतलेल्या धोरणावरही साक्षी महाराजांनी टीका केली आहे. अनेक अनावश्यक प्रकरणांमध्ये निकाल दिले आहेत. मात्र राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यावासा वाटत नाही ही बाब दुर्दैवी आहे असेही साक्षी महाराजांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्ट राम मंदिराच्या बाबतीत टाळाटाळ का करत आहे असाही प्रश्न साक्षी महाराजांनी उपस्थित केला.

साक्षी महाराजांनी जामा मशिदीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अयोध्या, मथुरा आणि काशी सोडा सर्वात आधी जामा मशीद तोडा तिथल्या शिड्यांखाली तुम्हाला मूर्ती मिळाल्या नाहीत तर मला खुशाल फासावर लटकवा असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. मुघलांच्या काळात हिंदू धर्मावर अन्याय झाला आहे. अनेक मंदिरे तोडण्यात आली आणि त्याजागी मशीदी उभारण्यात आल्या असेही साक्षी महाराजांनी म्हटले आहे.

१०० कोटी हिंदूंना हे वाटते की अयोध्येत राम मंदिर खरोखर उभारले जावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि धर्म मार्तंडांचीही हीच इच्छा आहे. यावर लवकरात लवकर अध्यादेश आला पाहिजे अशीही मागणी साक्षी महाराजांनी केली आहे.