एक्स बॉयफ्रेंडला नपुंसक केल्याप्रकरणी महिलेला १० वर्षांचा कारवास

एक्स बॉयफ्रेंडने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा राग या महिलेच्या मनात होता

एक्स बॉयफ्रेंडला नपुंसक केल्या प्रकरणी एका महिलेला १० वर्षांचा कारावास आणि २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ११ वर्षांनी या महिलेने एक्स बॉय फ्रेंडचा बदला घेतला आहे. बंगळुरुमध्ये ही घटना घडली आहे. ही महिला डेन्टिस्ट आहे. तिचा एक्स बॉय फ्रेंड आणि तिचं नातं २००८ मध्ये संपुष्टात आलं होतं. नोव्हेंबर २००८ मध्ये या महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर हल्लाही केला होता. कारण या महिलेच्या बॉयफ्रेंडने तिच्याशी नाते संपवून दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. एक्स बॉयफ्रेंडने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा राग या महिलेच्या मनात होता. त्याचमुळे या महिलेने त्याला आपल्या क्लिनिकला बोलावलं आणि त्याला नपुंसक केलं.

‘द न्यूज मिनिट’ने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेने, तिच्या एक्स बॉयफ्रेंडला तिच्या क्लिनिकवर बोलवलं. तिथे हा माणूस तिला भेटायला गेला. त्यानंतर या महिलेने तिच्या एक्स बॉय फ्रेंडला ज्यूस प्यायला दिला. या ज्यूसमध्ये गुंगीचं औषध मिसळण्यात आलं होतं. हा ज्यूस प्यायल्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या डेन्टिस्ट महिलेने त्याचे गुप्तांग तिच्याकडे असलेल्या दातांवर उपाय करण्याच्या सामग्रीने कापलं आणि गटारात फेकून दिलं. जेव्हा या माणसाला शुद्ध आली तेव्हा त्याला त्याच्यासोबत काय घडलं आहे ते कळलं. यानंतर या महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. या सगळ्या प्रकरणी पीडित पुरुषाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने या महिलेला दोषी ठरवून तिला दोन लाखांचा दंड आणि १० वर्षांचा कारावास अशी शिक्षा सुनावली.

या महिलेचे आणि पीडित पुरुषाचे प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यासोबतचे नाते संपवले आणि दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. जेव्हा या डेन्टिस्ट महिलेला ही बाब समजली तेव्हा तिने एक कट आखला. मला ज्याने सोडून दिलं त्या बॉय फ्रेंडला त्याच्या पत्नीसोबत वैवाहिक सुख मिळू नये असं तिने ठरवलं होतं. म्हणूनच तिने हे पाऊल उचललं. दरम्यान या सगळ्या प्रकरणी जेव्हा कोर्टात केस उभी राहिली तेव्हा महिलेच्या वकिलाने ही महिला निष्पाप असल्याचं सांगितलं. तसंच जे काही घडलं तो एक अपघात होता असा दावाही केला. मात्र सत्र न्यायालयाने या महिलेला दोषी ठरवलं आणि २ लाखांचा दंडही ठोठावला. तसेच दहा वर्षांसाठी या महिलेची रवानगी तुरुंगातही केली आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dentist gets 10 years in jail fined %e2%82%b9 2 lacks for cutting off ex boyfriends penis scj