Budget 2023: जो भारत पूर्वी स्वतःच्या समस्यांसाठी इतर देशांवर अवलंबून होता, तोच भारत आता जगभरातील दुसऱ्या देशांच्या समस्या सोडवू लागला आहे. आत्मनिर्भरतेमुळे भारत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. देशाचं सरकार भारताला भ्रष्टाचारमुक्त बनवू पाहात आहे, भारताला त्याचबरोबर एकही गरीब व्यक्ती नसलेला देश बनवणे हे आपले ध्येय आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज त्यांच्या संसदेतील अभिभाषणात म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज पहिल्यांदाच संसदेत अभिभाषण केलं. यावेळी त्यांनी केंद्रातल्या विद्यमान मोदी सरकारचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच आपला देश बदलत असल्याचं त्या म्हणाल्या. मुर्मू म्हणा्या की, “वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे आता लोकांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतोय. आपण ज्याची कामना करत होतो तो आधुनिक भारत आता घडू लागला आहे. देशात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर बनू लागलं आहे.”

हे ही वाचा >> Union Budget 2023 Live Updates: काय स्वस्त, काय महागणार? अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण कोणत्या घोषणा करणार? वाचा अर्थसंकल्पाशी निगडीत प्रत्येक अपडेट!

“देशाला स्थिर आणि निडर सरकार लाभलं”

राष्ट्रपती मुर्मू म्हणा्या की, “भारतात मोठं डिजीटल नेटवर्क तयार झालं आहे. त्याचबरोबर देशाला भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळत आहे. भारत हा देश मोठी अर्थ्यव्यवस्था म्हणून पुढे आहे. या सरकारने विकासाचा पाया घातला आहे.” केंद्रातल्या मोदी सरकारचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं. त्या म्हणाल्या की, “भारतात एक स्थिर, निडर आणि निर्णायक सरकार कार्यरत आहे. हे सरकार इमानदार लोकांचा सन्मान करणारं आहे. त्याचबरोबर आधुनिकतेला चालना देणारं सरकार आहे.”

हे ही वाचा >> Union Budget 2023: अदाणी समूहाचा गैरव्यवहार, बीबीसी वृत्तपट, बेरोजगारी यावर चर्चेसाठी विरोधक आग्रही; सरकारचे मात्र एका वाक्यात उत्तर

“जगाला हेवा वाटेल अशी वाटचाल भारत करत आहे”

राष्ट्रपती म्हणाल्या की, “आयुष्मान भारत योजनेने देशातील कोट्यवधी गरीबांचं कल्याण केलं आहे. आगामी काळात एकही गरीब व्यक्ती नसलेला देश बनणं हेच आपलं ध्येय असेल. भारत वैश्विक स्तरावर एक बलवान राष्ट्र बनू लागला आहे. आपल्या जागतिक भूमिका आत्मविश्वासाने पुढे नेणारं सरकार देशाला लाभलं आहे. त्याचबरोबर देशात आपली भ्रष्टाचारासोबत निरंतर लढाई सुरू आहे, देशात भ्रष्टाचाराचं उच्चाटन सुरू आहे. जगाला हेवा वाटेल अशी वाटचाल देश करत आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dependent india is now solving other countries problems says president draupadi murmu asc
First published on: 31-01-2023 at 12:04 IST