बाबा राम रहीम ४८ तासांसाठी तुरुंगाबाहेर; पोलीस संरक्षणात घेणार आईची भेट

दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि राम चंदर छत्रपती या पत्रकाराचा खून केल्याबद्दल त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे

डेरा सच्चा सौदा प्रमुख, स्वयंघोषित धर्मगुरु गुरमीत राम रहीम सिंह याला आज ४८ दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी त्याला ही सुट्टी देण्यात आली आहे. त्याला कडक बंदोबस्तामध्ये आईला भेटण्यासाठी नेलं आहे.

आपल्या दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि राम चंदर छत्रपती या पत्रकाराचा खून केल्याबद्दल त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरमीत राम रहीम सिंगने १७मे रोजी सुट्टीसाठी अर्ज केला होता. त्याचा हा अर्ज राज्य पोलिसांनी स्वीकारला आहे. त्याला आज सकाळी लवकर रोहतकच्या सुनारिया कारागृहातून बाहेर नेण्यात आलं. गुरुग्रामच्या एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्याच्या आईला भेटण्यासाठी त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नेलं आहे.

यापूर्वीही ऑक्टोबर २०२०मध्ये त्याला आपल्या आईला भेटण्यासाठी त्याला एक दिवसाची सुट्टी मंजूर करण्यात आली होती. बाबा राम रहीम हा २०१७ पासून कारावासात आहे.

सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात बाबा राम रहीम मुख्य आरोपी आहे. त्याचबरोबर कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्णण लाल या तिघांनाही कोर्टाने या हत्याप्रकरणी दोषी ठरवले होते. आज झालेल्या सुनावणीत या चौघांनाही कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २००२ रोजी रामचंद्र छत्रपती यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. डेऱ्यात सुरु असणारी बेकायदेशीर कृत्यं पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी उघड केली होती.

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनीच बाबा राम रहीमचा खरा चेहरा जगासमोर आणला होता. साध्वींसोबत झालेल्या बलात्काराची बातमी रामचंद्र छत्रपती यांनी आपलं वृत्तपत्र ‘पूरा सच’ मध्ये छापलं होतं. यानंतर वारंवार त्यांना धमक्या मिळत होत्या. यानंतरही रामचंद्र छत्रपती निर्भीडपणे बाबा राम रहीमविरोधात लिहित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dera chief gurmeet ram rahim singh granted parole to meet ailing mother vsk

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना