बीबीसीच्या गुजरात दंगलीवरील माहितीपटावरून देशातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी आणल्यानंतर ‘स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’कडून हैदराबाद विद्यापीठात या माहितीपटाचं स्क्रिनिंग करण्यात आलं. दरम्यान, याचा विरोध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदनेही ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचं स्क्रिनिंग केलं आहे. यावेळी दोन्ही गटातील विद्यार्थी आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – तिरूपतीजवळ सोलापूरच्या पाच तरूणांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांना पाच लाखांची मुख्यमंत्री सहायता मदत

गुजरात दंगलीबाबत ‘बीबीसी’ने काही दिवसांपूर्वी एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर केंद्र सरकारकडून या माहितीपटावर बंदी घालण्यात आली.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत गुरुवारी रात्री ‘स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’कडून हैदराबाद विद्यापीठात या माहितीपटाचं स्क्रिनिंग करण्यात आलं. यावेळी विद्यापीठातील ४०० विद्यार्थी हजर असल्याचा दावा एसएफयाकडून करण्यात आला. यावेळी दोन्ही गटातील विद्यार्थी आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं

हेही वाचा – Russia-Ukraine War : रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला; ११ जणांचा मृत्यू, इतर ११ जखमी

दरम्यान, बीबीसीच्या माहितीपटाविरोधात अभाविपकडूनही वसतीगृहाच्या कॅम्पसमध्ये विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल’चं स्क्रिनिंग करण्यात आलं. या चित्रपटात काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याराचे चित्रीकरण करण्यात आलं आहे. तत्पूर्वी अभाविपच्या विद्यार्थांना विद्यापीठाच्या मुख्य गेटवर रोखण्यात आल्याचं अभाविपकडून सांगण्यात आलं. तसेच विद्यापीठ प्रशासनाने बीबीसीच्या माहितीपटाला परवानगी दिली मात्र, आम्हाला परवानगी दिली नाही, असा आरोपही अभाविपकडून करण्यात आला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी वसतीगृहाच्या परिसरात या चित्रपटाचे स्क्रिनिंग

विशेष म्हणजे २१ जानेवारी रोजी हैदराबाद विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी बीबीसीच्या माहितीपटाचे स्क्रिनिंग आयोजित केलं होतं. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite ban sfi student wing screened bbc documentary at hyderabad university abvp screened the kashmir files spb
First published on: 27-01-2023 at 11:49 IST