राजस्थानमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. धौलपूर जिल्ह्यात दीराने वहिनीबरोबर विकृत कृत्य केलं आहे. त्यानंतर दीराने वहिनीला मारहाण केली आणि फरार झाला आहे. याप्रकरणी दीराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
दीर वहिणीला घेऊन धौलपूर येथील रुग्णालयात गेला होता. त्यावेळी गोड बोलून दीराने वहिनीला काळ्या डोंगराजवळ निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात तिच्यावर जबदरस्तीनं बलात्कार केला. वहिणीचा मोबाइल फोन हिसकावून घेत नंबर आणि डाटा डिलीट केला. नंतर तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि फरार झाला.




पीडित महिलेने घरी आल्यावर सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. यानंतर पीडित महिलेने पतीसह पोलीस ठाणं गाठून दीराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचं रुग्णालयात तपासणी करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस उपअधिक्षक सुरेश सांखला यांनी सांगितलं, “दीराने वहिनीवर बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.” ‘आज तक’ने हे वृत्त दिलं आहे.