ढाबा मालकाच्या मुलाने महिला डॉक्टरवर केला बलात्कार; आरोपीला अटक

जेवण देण्यासाठी गेला असताना घरी कोणी नसल्याचे पाहून आरोपीने महिलेवर बलात्कार केला आहे

dhaba owner son rapes female doctor arrests accused abn 97
ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यात मंगळवारी रात्री जेवण देण्यासाठी आलेल्या आरोपीने डॉक्टरवर बलात्कार केला

ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यात मंगळवारी रात्री एका घरात महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी सुकांत बेहेरा हा ढाबा मालकाचा मुलगा असून त्याने ३२ वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. छेदीपारा परिसरातील डॉक्टर घरी जेवण देताना आरोपीने हा बलात्कार केला.

महिला डॉक्टरवर तिच्याच घरी बलात्कार

पीडित महिला आरोग्य केंद्रात काम करते आणि ती तिच्या भावासोबत केंद्राद्वारे वाटप केलेल्या अधिकृत क्वार्टरमध्ये राहत होती. ही घटना घडली तेव्हा ती तिच्या अधिकृत क्वार्टरमध्ये एकटी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी पीडित मुलीच्या भावाने तिला स्थानिक ढाब्यातून जेवण आणण्यासाठी पाठवले, जेथे तो स्वत: काम करत होता. रात्री अकराच्या सुमारास आरोपी पीडितेच्या घरी जेवण घेऊन आला आणि पीडितेला एकटे पाहिल्यानंतर त्याने घरात जबरदस्तीने प्रवेश केला आणि महिला डॉक्टरवर बलात्कार केला.

जेवण देण्यासाठी आलेल्या युवकाने केला बलात्कार

महिला डॉक्टरने त्या मुलाला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही. त्यानंतर या तरूणाने जबरदस्तीने महिला डॉक्टर खोलीत खेचले आणि तिच्याबरोबर बलात्काराची केला. महिला डॉक्टरचा भाऊ घरी परत आल्यावर तीने हा सर्व प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करुन या प्रकरणाचा तपास सुरू केला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली

याप्रकरणी त्वरित कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dhaba owner son rapes female doctor arrests accused abn

ताज्या बातम्या