खासदार जाधव यांच्याकडून विकासकामे नासवण्याचे काम

परभणीचे खासदार संजय जाधव वाळूमाफिया, जमीन माफिया आहेत. व्यापाऱ्यांना मारहाण करून त्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांचे जिंतूर येथील जाहीर सभेत भाषण झाले. या वेळी दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकत्रे उपस्थित होते.

जिंतूरला धनंजय मुंडे यांची जाहीर सभेत टीका

परभणीचे खासदार संजय जाधव वाळूमाफिया, जमीन माफिया आहेत. व्यापाऱ्यांना मारहाण करून त्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले. विकासकामे तर केलीच नाहीत उलट विकासकामे नासवण्याचे काम त्यांनी केले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

जिंतूर येथे काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार माजीद मेमन, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, आमदार विजय भांबळे, मधुसूदन केंद्रे, रामराव वडकुते, उमेदवार राजेश विटेकर  सुरेश देशमुख यांची उपस्थिती होती. मुंडे म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत कोणतीच विकासकामे केली नाहीत. उलट नोटबंदी, जीएसटी लागू करून व्यापाऱ्यांसह नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले. कोणाच्याही खात्यावर १५ लाख जमा केले नाहीत किंवा बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध करून दिला नाही. मात्र सभांमधून यावर न बोलता पुलवामा घटनेचा उल्लेख करून मोदी मते मागत असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच वष्रे सरकारच्या अनेक योजनांवर टीका केली. राजीनामा खिशात असल्याचे सांगत सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली. मात्र पाच वष्रे सत्तेत राहून मलिदा लाटण्याचे काम ठाकरे यांनी केले असल्याचा आरोपही मुंडे यांनी या वेळी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dhananjay mundes remark in jintur

ताज्या बातम्या