दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात ‘लहरा दो तिरंगा’ मोर्च्यापूर्वी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आणि विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कॅनॉट प्लेस येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चाला परवानगी नाकारल्याची नोटीस बजावल्यानंतर तासाभरातच दिल्ली पोलिसांनी दिपकेंना ताब्यात घेतलं. कॅनॉट प्लेस परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले होते. तसेच सीजेपीच्या एक्स हँडलवरून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना आणखी किती लोकांना अटक करणार? असा इशाराही देण्यात आला.

अभिजीत दिपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चाला परवानगी नाकारल्याची नोटीस बजावल्यानंतर तासाभरातच दिल्ली पोलिसांनी दिपकेंना ताब्यात घेतलं. CJP चे तिन्ही मुख्य चेहरे सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याने संघटनेसमोर नेतृत्व संकट उभे ठाकले आहे. मात्र, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचा ‘प्लॅन बी’ तयार असल्याचा दावा कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आला आहे. ‘इंडिया टूडे’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

ध्रुव राठीने X वर पोस्ट करत ही टीका केली आहे.

ध्रुव राठीची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

“केवळ एक देशद्रोही पंतप्रधानच भारतीय राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊ शकतो आणि त्यांच्यावर हल्ला करु शकतो”, अशी टीका ध्रुव राठीने X वर पोस्ट करत केली आहे.

CJP चा ‘प्लॅन बी’ तयार असल्याचा दावा!

अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्याच्या काही मिनिटे आधी CJP च्या मीडिया टीमचे प्रतिनिधी विजय एम यांनी माहिती दिली की, १० ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनाप्रमाणेच या वेळीही पक्षाने ऐनवेळची रणनीती म्हणून ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे. दिल्ली पोलिसांनी दिपकेंना रोखल्यास किंवा ताब्यात घेतल्यास आम्ही आमची नवी रणनीती जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अटकेनंतर आता आंदोलनाची धुरा कोण सांभाळणार आणि CJP चा हा ‘प्लॅन बी’ नेमका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.