Digital Arrest Scam : टेलिकॉम रेग्युलटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) आणि महाराष्ट्र पोलिस अधिकारी असल्याचे खोटे सांगून एका ९२ व्यक्तीला फसवणाऱ्या दोन आरोपींनी अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आरोपींनी डिजीटल अरेस्टच्या माध्यमातून एका ९२ वर्षीय निवृत्त एम्स सर्जनला ३ कोटी रुपयांना फसवले. लुबडण्यात आलेल्या रकमेपैकी २.२ कोटी रुपये पीडित व्यक्तीला परत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना १२ मार्च रोजी घडली. या घटनेत ग्रेटर कैलास राहणार्या या व्यक्तीला अज्ञात नंबरवरून सलग दोन फोन करण्यात आले. ज्यामध्ये सुरुवातीला एका महिलेने स्वतःची ओळख ट्रायची अधिकारी म्हणून करून दिली, तिने पीडित व्यक्तीला त्ंयाचा नंबर मनी लाँड्रिंग प्रकरणात सामील असल्याचे आढळून आल्याचे सांगितले.
त्यांना सांगण्यात आले की जर तुम्हाला केस बंद करायची असेल तर त्यांना महाराष्ट्र पोलिसांशी बोलावे लागेल… पीडित व्यक्ती तयार झाला आणि त्यांचा कॉल दुसर्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्यात आला, ज्याने आपण महाराष्ट्र पोलीस असल्याचा दावा केला, अशी माहिती डीसीपी (इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्टॅटजीक ऑपरेशन्स) हेमंत तिवारी यांनी दिली.
आरोपीनी पीडित व्यक्तीला सांगितेल की तो याबद्दलची माहिती कोणाला सांगू शकत नाही. जर त्यांनी असे केले तर ही माहिती ज्यांना कोणाला असेल त्या सर्वांची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
पीडित व्यक्तीला बनवट कोर्ट ऑर्डरच्या कॉपी दाखवण्यात आल्या, ज्यामध्ये अनेक फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे दाखवण्यात आले होते, असे तिवारी म्हणाले. त्यानंतर पीडित व्यक्तीची आरोपींकडून व्हर्च्युअल ट्रायल घेण्यात आली.
“… निवृत्त सर्जनने खूपदा विनंती केल्यानंतर, आरोपीने त्या माणसाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला. त्यांनी त्याला सांगितले की त्याला त्याचे सर्व पैसे सेबी रेगुलेटरी खात्यात ट्रान्सफर करावे लागतील. त्यांनी आश्वासन दिले की सर्व आरोपातून मुक्त झाल्यानंतर पैसे परत केले जातील,” त्यानंतर पीडित व्यक्तीने त्याचे सर्व पैसे तीन खात्यांमध्ये ट्रान्सफर केले, असे तिवारी यांनी सांगितले.
१५ मार्च पर्यंत त्यांना आरोपीकडून कोणतीही माहिती मिळाली नाही, त्यानंतर पीडित व्यक्तीने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या आयएफएसओ यूनिटकडे तक्रार दाखल केली.
त्यानंतर एसीपी (आयएफएसओ) विवेकानंद झा यांच्या नेतृत्वाखाली आणि डीसीपी (आयएफएसओ) तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले, ज्याने या फसवणुकीच्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचे सविस्तर विश्लेषण केले. यानंतर बँक खाती शोधण्यात आली आणि एका आरोपीचा राजस्थानमध्ये माग काढण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छापा टाकण्यात आला आणि खाती उघडणाऱ्या अमित शर्मा (४२) याला अटक करण्यात आली. त्याचा सहकारी हरी (२७) याला गुवाहाटी येथून अटक करण्यात आली. शर्माने हे पैसे हरीकडे हस्तांतरित केले, ज्याने ते पैसे नेपाळ आणि तैवानमधील फसवणूक करणाऱ्यांना घोटाळे करण्यासाठी पाठवले, असे तिवारी म्हणाले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, छापा टाकण्यात आला आणि ४२ वर्षीय अमित शर्मा याला अटक करण्यात आली, शर्मानेच ही खाती उघडली होती असे पोलिसांनी सांगितले. त्याचा साथिदार हरी याला गुवाहाटीवरून अटक करण्यात आली. शर्मा याने पैसे हरिला ट्रान्सफर केले होते, ज्यापैकी त्याने काही पुढे नेपाळ आणि तैवान येथील अशीच फसवणूक करणार्यांना पाठवले असे, तिवारी म्हणाले.
फसवणुक करण्यात आलेल्या रकमेपैकी २.२ कोटी रुपये पीडित व्यक्तीला परत करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.