scorecardresearch

यापुढे डायरेक्ट अॅक्शन, सूचना नाही… भाजपा नेत्याचा सब्यसाची मुखर्जींना इशारा

वादग्रस्त जाहिरात हटवल्याचं सब्यसाचीकडून जाहीर करण्यात आलं आहे.

यापुढे डायरेक्ट अॅक्शन, सूचना नाही… भाजपा नेत्याचा सब्यसाची मुखर्जींना इशारा
सब्यसाची मंगळसूत्र कॅम्पेन (फोटो साभार: sabyasachiofficial/Instagram)

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सोमवारी सब्यसाची मुखर्जी यांना आक्षेपार्ह जाहिरात मोहिमेची पुनरावृत्ती करण्याविरूद्ध इशारा दिला आहे. जर मुखर्जींनी पुन्हा अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या तर कोणतीही चेतावणी दिली जाणार नाही आणि थेट कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले आहे.

माझ्या पोस्टनंतर सब्यसाची मुखर्जी यांनी आक्षेपार्ह जाहिरात मागे घेतली आहे. त्याने असा प्रकार पुन्हा केल्यास थेट कारवाई केली जाईल आणि कोणताही इशारा दिला जाणार नाही. त्याला आणि त्याच्यासारख्यांना लोकांच्या भावना दुखावू नयेत असे आवाहन करतो,” असं मिश्रा म्हणाले. सब्यसाचीने मंगळसुत्राची जाहिरात मोहीम मागे घेतल्यानंतर मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांची टिप्पणी आली आहे.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी मंगळसूत्रावर केलेली त्यांची वादग्रस्त जाहिरात मागे घेतली. या जाहिरातीबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सब्यसाचीला इशारा दिला होता की, येत्या २४ तासात ही जाहिरात हटवली नाही तर त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला जाईल. मिश्रा यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनीही यावर कठोर भूमिका घेतली. आता आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर माहिती देताना सब्यसाचीने सांगितले की ती जाहिरात काढून टाकली जात आहे.

हेही वाचा – अखेरीस डिझायनर सब्यसाचीने मंगळसूत्राची ‘ती’ जाहिरात घेतली मागे

काय आहे हे प्रकरण?

चार दिवसांपूर्वी सब्यसाचीने ज्वेलरी कलेक्शन लाँच केले. ‘द रॉयल बंगाल टायगर आयकॉन’ असे या कलेक्शन नाव आहे. यावरून मंगळसूत्राच्या जाहिरातीवरून गोंधळ सुरू झाला. कंपनीने या मंगळसूत्राला ‘द रॉयल बंगाल मंगळसूत्र १.२’ असे नाव दिले आहे. जाहिरातीत एक महिला आणि एक पुरुष असभ्य कपड्यांमध्ये एकत्र मंगळसूत्र घातलेले दाखवले आहे. सुरुवातीला सोशल मीडियावर याला खूप विरोध झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या