पीटीआय, विल्मिंग्टन
‘क्वाड’ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यादरम्यान सफल चर्चा झाली, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्परहितांच्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचे मार्ग याविषयी चर्चा झाली. तसेच हिंद-प्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक व प्रादेशिक मुद्देही चर्चेमध्ये उपस्थित झाल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी शनिवारी फिलाडेल्फिया येथे पोहोचले. बायडेन यांचे मूळ गाव असलेल्या डेलावेर येथे क्वाड शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारीच ग्रीनव्हिले येथील बायडेन यांच्या घरी दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय चर्चा पार पडली. त्यापूर्वी बायडेन यांनी मोदींचे आपुलकीने स्वागत केले. ही चर्चा परस्परहितांच्या क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिका भागीदारी अधिक मजबूत करण्यावर केंद्रित होती असे परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’वर पोस्ट लिहून सांगितले. तसेच राष्ट्रप्रमुख या नात्याने होणारी ही भेट अखेरची असल्याने दोन्ही नेते भावूक झाले होते, असेही परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्राी यांनी सांगितले.

Umarkhed, Digras, Ralegaon, Sanjay Rathod,
उमरखेडमध्ये दोन माजी आमदारांचे नवख्यांना आव्हान; दिग्रस, राळेगावमध्ये आज-माजी मंत्र्यांची शक्ती पणाला
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
khanapur vidhan sabha
सांगली, जत, खानापूरमध्ये बंडखोरी; अन्यत्र आघाडी – महायुती लढत
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!
What Sada Sarvankar Said?
Sada Sarvankar : “मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार आणि…”; सदा सरवणकर यांचं वक्तव्य

हेही वाचा >>>चीनकडून ‘आपली’ परीक्षा! ‘क्वाड’ बैठकीत बायडेन यांची टिप्पणी; ‘हॉट माइक’मुळे जगजाहीर

भेटीदरम्यान, बायडेन यांनी मोदींच्या ऐतिहासिक पोलंड व युक्रेन दौऱ्याची प्रशंसा केली. तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, संरक्षण, व्यापार, हरित ऊर्जेसारखे अन्य महत्त्वाचे मुद्देही चर्चेदरम्यान उपस्थित झाले.चीनच्या वाढत्या लष्करी ताकदीबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच, दोन्ही नेत्यांच्या चर्चेदरम्यान संरक्षण व्यापारावरही महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

मोदींच्या या दौऱ्यादरम्यान अमेरिकेने भारताकडे २९७ प्राचीन भारतीय वस्तू सोपवल्या आहेत. यापैकी काही वस्तू दोन हजार वर्षे जुन्या आहेत. या प्राचीन वस्तू तस्करीच्या मार्गाने देशाबाहेर नेण्यात आल्या होत्या, अशी माहिती अधिकृत निवेदनामध्ये देण्यात आली.