नवी दिल्ली : मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याचे प्रकरण जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असल्याने राज्य सरकारने त्याची अधिक गांभीर्याने हाताळणी करायला हवी होती, अशी भावना भाजपच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांमध्ये असल्याचे समजते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी असून पुतळ्याचा आराखडा व उभारणी नौदलाने केली होती. तसेच, ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहात असल्याने या पुतळ्याचे नुकसान झाले असावे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

या विधानामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे या घटनेपासून राज्य सरकारला अलिप्त करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा नौदलाच्या अखत्यारीत येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटल्यामुळे या घटनेची जबाबदारीही नौदलाची असल्याचे सूचित होते, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. शिवाय, गेल्या वर्षी ४ डिसेंबरमध्ये नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. नौदल आणि मोदी यांच्या संदर्भामुळे या घटनेचा ठपका केंद्र सरकारवर लावला जाण्याचा तसेच, त्याचा राजकीय गैरफायदा विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून घेतला जाण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेचे पडसाद थेट केंद्रापर्यंत येऊ नयेत, याची खबरदारी घेतली जात असल्याचे समजते.

Lalu Prasad Yadav and Tejswi Yadav
लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या मुलांना दिलासा; ‘Land For Jobs’ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर!
president draupadi murmu in udaipur
राष्ट्रपतींच्या ‘त्या’ दौऱ्यावर भाजपा खासदाराचा आक्षेप; पतीच्या वडिलांची…
Swami Avimukteshwaranand Saraswati on cow
Swami Avimukteshwaranand : “गाय आमची माता, तिला जनावरांच्या यादीतून वगळा”, अविमुक्तेश्वरानंदांची मोदी सरकारकडे मागणी
arvind kejriwal narendra modi
Arvind Kejriwal : “…तर मी भाजपाचा प्रचार करेन”, अरविंद केजरीवाल असं का म्हणाले?
explosion that caused injuries and destroyed vehicles at outside the Karachi airport, Pakistan,
Blast in Pakistan : हल्ला की अपघात? पाकिस्तानच्या कराचीतील स्फोटात चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?
girl poisoned 13 family members in pakistan
पाकिस्तानात तरुणीनं आपल्याच कुटुंबातील १३ जणांची केली हत्या; प्रियकराशी लग्नास दिला होता नकार!
Uttar Pradesh Shahjahanpur MBBS Student suspicious Death
Uttar Pradesh : रक्ताच्या थारोळ्यात सापडला MBBS चा विद्यार्थी; हत्या की आत्महत्या? संशयास्पद मृत्यूमुळे पोलीसही पेचात!
Israel Attacked on Hezbollah
इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!
Israel hamas war 19 killed
वर्षभरात संघर्ष चिघळला, गाझा, बैरुतवरील हल्ल्यात १९ ठार; इस्रायलमधील गोळीबारात एकाचा मृत्यू

हेही वाचा >>> बांधकाम विभागाच्या पत्राकडे नौदलाचे दुर्लक्ष?

मंत्र्यांची विधाने हास्यास्पद

राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी केलेल्या हास्यास्पद विधानांमुळेही भाजपमधील केंद्रीय नेते नाराज झाल्याचे समजते. राज्य सरकारने कोणतेही आढेवेढे न घेता या प्रकरणाची हाताळणी केली असती तर अधिक योग्य ठरले असते. ही घटना कोणामुळे झाली व कोणाची जबाबदारी यावर भाष्य करण्यापेक्षा झाल्या प्रकाराबद्दल लोकांमधील असंतोष वाढू न देण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असाही मुद्दा भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्ये चर्चिला गेल्याचे समजते.

संवेदनशील प्रकरणे काळजीपूर्वक व सबुरीने हाताळावीत

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचाही प्रचार ‘महायुती’कडून वाजतगाजत केला जात आहे. अशावेळी शिवपुतळा कोसळण्याची घटना ‘महायुती’च्या लोककल्याणाच्या योजनांच्या प्रचारामध्ये अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळे अशी संवेदनशील प्रकरणे राज्य सरकारच्या स्तरावर अत्यंत काळजीपूर्वक व सबुरीने हाताळली गेली जावीत, असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे म्हणणे असल्याचे समजते.