प्रभारी हरीश रावत यांच्या नेतृत्वविषयक विधानामुळे नाराजी

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते चरणजीर्तंसह चन्नी हे पंजाबचे पहिले दलित-शीख मुख्यमंत्री बनले असले तरीही पक्षांतर्गत वाद मात्र कायम असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. सहा महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक प्रदेशाध्यक्ष नवज्योर्तंसग सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे वादग्रस्त विधान प्रभारी हरीश रावत यांनी केले. या विधानावरून रावत यांच्यावर टीका होत आहे.

चंडीगडमध्ये राजभवनात चन्नी यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, या कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हेही उपस्थित होते. मात्र, रावत यांनी, पंजाबमध्ये सहा महिन्यांनी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व नवज्योर्तंसग सिद्धू करतील, असे वादग्रस्त विधान केले. त्यावर काँग्रेस अंतर्गत नाराजी व्यक्त होत असून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार राहिलेले सुनील जाखड यांनी रावत यांच्यावर टीका केली. चन्नी यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाली असताना नवज्योर्तंसग सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली जाणार असल्याचे विधान करणे म्हणजे चन्नी यांच्या अधिकारपदाला धक्का लावण्याजोगे आहे. (फक्त सिद्धूंना महत्त्व दिले जाणार असेल तर) चन्नी यांच्या नियुक्तीला अर्थ उरणार नाही, असा संताप जाखड यांनी व्यक्त केला. चन्नी हे कमकुवत मुख्यमंत्री असल्याचा चुकीचा संदेश रावत देत असल्याचे जाखड यांचे म्हणणे आहे.

जाखड यांनी अमरिंदरसिंग … सिंग यांच्या हकालपट्टीचे समर्थन केले असून चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय योग्य असल्याचेही म्हटले आहे. बहुतांश आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याने अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. चन्नी हे अर्मंरदर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. तीन वेळा आमदार झालेले चन्नी हे नवज्योर्तंसग सिद्धू यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांच्या संमतीने चन्नी यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याचे सांगितले जात आहे.   

पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीर्तंसह चन्नी यांचा सोमवारी चंडीगडमध्ये शपथविधी होत असताना छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एर्स. सिंह देव दिल्लीत दाखल झाल्याने आणखी एका काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली. मात्र, छत्तीसगडमध्ये सर्वकाही आलबेल असून आपण खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीत आलो आहे. काँग्रेस हायकमांड (राहुल गांधी) तसेच, अन्य ज्येष्ठ नेतेही राजधानीत नसल्याने कोणाशीही भेट ठरलेली नसल्याचा दावा देव यांनी केला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि देव यांच्यातील वाद राहुल गांधी यांच्या मध्यस्थीनंतर संपुष्टात आल्याचे सांगितले जात असले तरी देव यांना मुख्यमंत्री बदलाची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात देव तसेच बघेल यांच्या दिल्लीवाऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर देव हे बघेल यांच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते.