लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ‘भारत जोडो न्याय’ यात्रेमध्ये काँग्रेसचे नेते गुंतले असल्याने ‘इंडिया’च्या घटक पक्षांतील जागावाटपाची चर्चा रेंगाळली आहे. त्यातच पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश तसेच, बिहार या राज्यांमध्ये अंतर्गत कलहामुळे जागावाटपाचा वाद अधिक तीव्र झाला आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ नये यासाठी राहुल गांधी यांना अप्रत्यक्षपणे मध्यस्थी करावी लागत आहे. महाराष्ट्रातही मविआच्या जागावाटपासंदर्भात दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट गेली होती.

BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
South Central Mumbai
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांत धुसफूस, शिवसेनेकडून प्रचार फेऱ्यांना सुरुवात
Samajwadi Party akhilesh yadav
मुरादाबादमध्ये सपाकडून दोन दिवसांत दोन अर्ज; रामपूरमध्ये उमेदवार जाहीर, आणखी एका दावेदाराने वाढवला तणाव

त्यामुळे या आठवडय़ामध्ये ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या वाटाघाटींना या आठवडय़ामध्ये पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व काँग्रेस यांच्यामधील जागावाटपाची चर्चा अडथळय़ांची शर्यत ठरू लागली आहे. प्रदेशाध्यक्ष व लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना यात्रेमध्ये सहभागी करून घेण्यास विरोध केला आहे. तृणमूल काँग्रेस राज्यातील सर्व ४२ जागांवर निवडणूक लढवण्याची चाचपणी करत असल्याने ममता बॅनर्जी संधीसाधू असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे राहुल गांधींना हस्तक्षेप करावा लागला आहे. ‘ममता बॅनर्जी यांच्याशी सलोख्याचे संबंध असून राज्यस्तरीय नेत्यांच्या उलट-सुलट बोलण्याचा दोन्ही पक्षांच्या जागावाटपाच्या वाटाघाटींवर कोणताही परिणाम होणार नाही’, असे राहुल गांधी यांना मंगळवारी स्पष्ट करावे लागले.

हेही वाचा >>>सुंदर, गोड, निरागस आणि लोभस भगवान रामाच्या मूर्तीचं नामकरण; पूजाऱ्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती!

ईशान्येकडील राज्यांतून यात्रा पश्चिम बंगालमध्ये जाणार असून ममता बॅनर्जी यांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या सहभागाबाबत साशंकता आहे. बिहारमध्येही मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव तसेच, लालू प्रसाद यादव यांनाही यात्रेचे निमंत्रण दिलेले आहे. नितीशकुमार सहभागी होणार नाहीत, तर राजदच्या नेत्यांनी अजून प्रतिसाद दिलेला नाही.बिहारमध्ये जनता दल व राष्ट्रीय जनता दल यांच्यातील मतभेद वाढू लागल्याचे बोलले जात आहे. त्यातच, नितीशकुमार यांनी मंगळवारी अचानक राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतल्याने चर्चाना उधाण आले आहे. 

उत्तर प्रदेशात तिढा वाढला

उत्तर प्रदेशमध्येही समाजवादी पक्ष व राष्ट्रीय लोकदल या दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केली असून जागावाटपाचे सूत्र निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा अधिक वाढला आहे. महाराष्ट्रामध्येही महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात शिवसेनेशी वाटाघाटी करण्यासाठी काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत मुंबईला गेले होते. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आल्याचे मानले जात आहे.