सोशल मीडियामुळं वैवाहिक जीवनावर होणाऱ्या विपरित परिणामांचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. त्यानुसार, टिकटॉक या व्हिडिओ शेअरींग अॅपवर लोखोंचे फॉलोअर्स असलेल्या महिलेने आपल्या पतीला घटस्फोट दिल्याची घटना घडली आहे.

असिम आणि आयेशा (दोघांची नावं बदलली आहेत) यांचे २००८ मध्ये लग्न झाले. ते मध्य बंगळुरुत एकत्र कुटुंबात राहत होते. दरम्यान, सन २०१४ मध्ये या दाम्पत्याला एक मुलगा झाला. असिम एका दुकानात सेल्समन म्हणून काम करीत होता. दरम्यान, त्याला सौदी अरेबियात चांगल्या पगाराच्या कामाची संधी आली त्यामुळे त्याने आपल्या पत्नी, मुलगा, आई-वडिलांना बंगळुरुतच ठेऊन एकट्यानं तिकडं जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, अमिस बंगळुरुला गेल्यानंतर त्याच्या बंगळुरुतील शेजाऱ्यांनी आयेशाला टिकटॉक अॅपची ओळख करुन दिली. त्यानंतर काही दिवसांतच ती या अॅपमध्ये व्हिडिओ बनवण्यात गुंतून गेली. तिने या अॅपवर अनेक व्हिडिओ तयार करुन अपलोड करायला सुरुवात केली. तिच्या या व्हिडिओजना लाखोंचे फॉलोअर्सही तयार झाले. दरम्यान, या दाम्पत्यामध्ये या प्रकरणावरुन वाद सुरु झाला. हा वाद तो थेट पोलीस आयुक्तालयापर्यंत गेला. तिथे पोलिसांनी त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी कौटुंबिक समुपदेशन सुरु केले.

दरम्यान, या दाम्पत्याचे समुपदेशन करणारे वरिष्ठ समुपदेशक इकबाल अहमद यांनी सांगितले की, सन २०१९ मध्ये जेव्हा असिम रियाध येथे कामानिमित्त राहत होतो तेव्हा त्याला त्याच्या बंगळुरुतील एका मित्रानं एका महिलेचा आक्षेपार्ह पद्धतीचा डान्स करतानाचा टिकटॉक व्हडिओ फॉरवर्ड केला, हा व्हडिओ पाहून असिम सुन्न झाला. कारण हो व्हिडिओ चक्क त्याच्या बायकोचाच होता. त्याच्या मित्राने त्याला सांगितले की, त्याचा बायकोचे टिकटॉकवर लाखो फॉलोअर्स आहेत. तसेच तिच्या व्हिडिओवर हजारो कमेंटही येत असतात. त्यानंतर असिमने आपल्या बायकोला फोन आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून याबाबत विचारणा केली. त्यावर तिनं सांगितलं की, तुमचा मित्र माझे फेक व्हिडिओ दाखवून माझी बदनामी करीत आहे. मात्र, असिमची बायको त्याला या गोष्टी समजावण्यात असमर्थ ठरली. त्यानंतर असिमने रियाधमधील आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून पुन्हा बंगळूरूला परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने तिला टिकटॉकवर तिचे असे अनेक व्हिडिओ असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे पत्नी खोटं बोलत असल्याचे उघड झाले.

महिलेनं दिला पतीला घटस्फोट

दरम्यान, पतीच्या आक्षेपानंतरही संबंधीत महिलेने टिकटॉकवरील आपले व्हिडिओ अपलोड करणे बंद करणार नसल्याचे सांगितले. कारण तिला अनेक वर्षांपासूनचे आपल्या परफॉर्मन्सचे चाहते असलेले लाखो फॉलोअर्स गमवायचे नव्हते. अखेर या दाम्पत्यामधील वाद संपला तो घटस्फोटाच्या निर्णयावरच. त्यानंतर मुलाचा ताबा मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये पुन्हा कौटुंबिक वाद सुरु झाला.