“मोदी सरकारकडे जनतेसाठी…”, महागाईवरुन राहुल गांधींनी व्यक्त केली खंत

पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या नावाखाली सरकार नागरिकांची पिळवणूक करत असल्याचा आरोप राहुल गांधी आणि काँग्रेसने केला होता.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीकास्त्र सोडले आणि म्हटले की, दिवाळीच्या काळात महागाई शिगेला पोहोचली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणाले, “आज दिवाळी आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. हा विनोद नाही. मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा आहे.”

पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या नावाखाली सरकार नागरिकांची पिळवणूक करत असल्याचा आरोप राहुल गांधी आणि काँग्रेसने केला होता. यापूर्वी सोमवारी, राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. पाकिटमारांपासून सावध राहा असं सांगत त्यांनी #TaxExtortion हॅशटॅग वापरून ट्विट केले. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटसह एका बातमीचा हवाला दिला ज्यामध्ये म्हटले आहे की काही राज्यांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर १२० रुपयांच्या पुढे गेले आहेत आणि केंद्राने २०१८-१९ मध्ये २.३ लाख कोटी रुपये आणि २०१७-१८ मध्ये २.५८ लाख कोटी रुपये इंधन कर म्हणून जमा केले.

तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही मोदी सरकारवर टीका केली. महागाई हे नरेंद्र मोदी सरकारने जनतेला दिलेलं दिवाळी गिफ्ट आहे असा टोला त्यांनी लगावला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali inflation fuel prices congress rahul gandhi pm modi government vsk

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या