कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिवकुमार हे कनकपुरा या ठिकाणी आभार यात्रा करत होते. या दरम्यान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी एक कृती केली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिवकुमार आले म्हणून त्यांना फळांची एक भलीमोठी माळ घालण्यात आली. त्यातल्या एका सफरचंदाचा तुकडा त्यांनी खाल्ला आणि बाकीची माळ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने भिरकावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

डी. के. शिवकुमार यांनी नुकतीच कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यावेळी त्यांनी सफरचंद खाऊन फळाची माळ कार्यकर्त्यांच्या दिशेने भिरकावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना हारोहल्ली गावात झाली आहे. शेकडो किलो सफरचंद आणि फुलांनी भरलेली माळ डी. के. शिवकुमार यांच्या स्वागतासाठी आणण्यात आली होती. यातला एक तुकडा खाऊन त्यांनी माळ कार्यकर्त्यांच्या दिशेने भिरकावली. यावरुन विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

डी. के. शिवकुमार यांचा व्हिडीओ व्हायरल, विविध प्रतिक्रिया

डी. के शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आभार दौरा काढला. अनेक ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. बऱ्याच भागांमध्ये डीके, डीके चे नारे देण्यात आले. तसंच फुलांची बरसात करण्यात आली. फटाके फोडून डी. के. शिवकुमार यांचं स्वागत करण्यात आलं. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात डी. के. शिवकुमार हे या सगळ्याला सामोरे गेले. दरम्यान त्यांचा जो माळ भिरकावतानाचा व्हिडीओ आहे तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. एखाद्या मुख्यमंत्र्याला असं करणं शोभत नाही असं काही लोक म्हणत आहेत. तर काही लोकांनी या कृतीकडे राजकारण म्हणून पाहू नये असंही म्हटलं आहे.

सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया

डी. के. शिवकुमार यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या. डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना हे असं वर्तन शोभतं का? असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला. तर एकाने म्हटलं आहे की डी. के. शिवकुमार हे काय स्वतःला देव समजतात का? हा नेमका प्रकार काय आहे? लोकांना तुच्छ का समजत आहात? काही नेटकरी शिवकुमार यांची बाजूही घेत आहेत. डी. के. शिवकुमार देव नाहीत. पण ते सामान्यांचे नेते आहेत. सफरचंद खाऊन त्यांनी आम्हा सगळ्यांचं प्रेम, आपुलकी मान्य केली आणि ते वाटूनही टाकलं कारण त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे असंही एकाने म्हटलं आहे. संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसतं आहे?

डी. के. शिवकुमार यांचा जो व्हिडीओ व्हायरल झालाय त्यात हे दिसतं आहे की त्यांच्या स्वागतासाठी फळांनी आणि फुलांनी भरलेली एक माळ क्रेनने आणली गेली. या माळेतलं एक फळ त्यांनी एक तुकडा तोडून खाल्लं. त्यानंतर ही माळ कार्यकर्त्यांच्या दिशेने भिरकावली. सोशल मीडियावर त्यांचा हाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. डी. के. शिवकुमार यांनी जेव्हा ही कृती केली तेव्हा टाळ्या वाजल्या आणि नारेबाजी करण्यात आली. काही समर्थकांनी हवेतल्या हवेत सफरचंदाचे तुकडे हातात झेलण्यासाठी हात उंचावले. तर काही लोक माळ आपल्या दिशेने फेकलेली पाहून चित्कार करु लागले. या ठिकाणी एखाद्या उत्सवासारखा माहोल तयार झाला होता.

डी. के. शिवकुमार काय म्हणाले?

मी आज हारोहल्ली आणि कग्गलिपुरामध्ये आलो होतो. इथे मी माझ्या लोकांशी संवाद साधला. मी कनकपुरा या ठिकाणी गेलो. मला लोकांनी आशीर्वाद दिला. लोकांचं प्रेम आणि त्यांनी केलेलं माझं स्वागत यामुळे मी भारावून गेलो आहे. मी तुम्हा सगळ्यांमुळेच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसू शकलो असं डी. के. शिवकुमार म्हणाले.

डी. के. शिवकुमार यांना संकटमोचक का म्हटलं जातं?

काँग्रेसचे संकटमोचक असलेले डी.के. शिवकुमार हे रिसॉर्ट पॉलिटिक्ससाठी देखील ओळखले जातात. शिवकुमार यांनी कर्नाटकच नव्हे तर महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारदेखील वाचवलं आहे. तर, प्रतिष्ठेच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह यांना देखील भारी पडले होते. शिवकुमार हे केवळ एक कसलेले राजकारणी नसून, एक शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. देशभरात जेव्हा जेव्हा काँग्रेसचे सरकार अडचणीत आले, तेव्हा तेव्हा ते वाचवण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याच अष्टपैलू आणि संकट निवारक क्षमतेमुळे त्यांना काँग्रेसचे ‘संकटमोचक’ म्हटले जाते.

डी. के. शिवकुमार यांची कारकीर्द कशी आहे?

१९८० मध्ये कनकपुरातील एका महाविद्यालयातून डी. के. शिवकुमार यांनी NSUI या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून राजकीय आयुष्य सुरु केलं.

१९८५ मध्ये डी. के. शिवकुमार यांनी त्यांची पहिली निवडणूक सातनूर विधानसभा मतदारसंघातून लढले होते. ही निवडणूक त्यांनी एच. डी. देवेगौडांच्या विरोधात लढवली होती.

१९८९ ला सातनूर विधानसभा मतदारसंघातूनच डी. के. शिवकुमार पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग आठवेळा ते आमदार झाले.

१९९० ते १९९२ या कालावधीत ते तुरुंग प्रशासन मंत्री म्हणून शिवकुमार यांनी काम केलं. १९९९ ते २००४ ते कर्नाटकचे नगर विकास मंत्री होते.

२०१९ मध्ये त्यांना निष्ठा सिद्ध करावी लागली. अनेक राजकीय चढ-उतारांचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी पक्षाची साथ सोडली नाही. राजकीय चढ-उतार असतानाही त्यांनी पक्ष सोडला नाही. ही बाब विशेष.

२०२० मध्ये त्यांना कर्नाटक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष प देण्यात आलं. त्या काळात पक्ष कर्नाटकमध्ये बराच अडचणीचत आला होता. मात्र शिवकुमार यांनी संघटना पुन्हा उभी केली आणि २०२३ मध्ये विजय खेचून आणला