scorecardresearch

तमिळनाडूतील २१ महापालिकांत द्रमुकची सत्ता

राज्यातील प्रमुख विरोधक अण्णा द्रमुकचे प्रभावक्षेत्र कोईमतूर भागातही द्रमुकने मुसंडी मारली.

चेन्नई : तमिळनाडूतील पालिका निवडणुकीत सत्तारूढ द्रमुकने १२ हजार ८०० प्रभाग जिंकले आहेत. एकूण जवळपास दोनतृतीयांश प्रभागांत त्यांना यश मिळाले आहे. सर्व २१ महापालिका द्रमुकने जिंकल्या आहेत.

राज्यातील प्रमुख विरोधक अण्णा द्रमुकचे प्रभावक्षेत्र कोईमतूर भागातही द्रमुकने मुसंडी मारली. चेन्नईसह सर्व २१ तसेच १३८ पालिका व ४९० नगरपंचायतींपैकी बहुसंख्य ठिकाणी द्रमुकचे प्राबल्य आहे. सत्तारूढ द्रमुकने महापालिकेतील ९४६ प्रभाग तसेच पालिकांमधील २३६० प्रभाग व नगरपंचायतींमधील ४३८८ प्रभाग जिंकले आहेत. अण्णा द्रमुकला दोन हजार प्रभाग जिंकता आले. भाजपने स्वबळावर  महापालिकांमध्ये २२ तर नगरपालिकांमध्ये ५६ तर नगरपंचायतीमध्ये २३० प्रभागांमध्ये यश मिळवले.

द्रमुकचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने महापालिकांमध्ये ७३ ठिकाणी तर १५१ नगरपालिकांमध्ये व ३६८ नगरपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.

 भाजपला कोठेही बहुमत मिळाले नाही. भाजपला राज्यातील इतर लहान पक्षांपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dmk power in 21 municipal corporations in tamil nadu akp

ताज्या बातम्या