Tamil Nadu Election Results 2026 emotional video of DMK worker crying after the party slipped to third place: तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ च्या मतमोजणीला आज (४ मे) सकाळी ८:०० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यामध्ये सत्ताधारी डीएमके आणि प्रमुख विरोधी पक्ष एआयडीएमके या दोन्ही प्रमुख पक्षांना अभिनेते विजय थलपथी यांच्या टीव्हीके पक्षाने जोरदार धक्का दिल्याचे दिसत आहे.

सकाळी ८:३० वाजल्यापासून ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू झाली असून, आता राज्यभरातील प्रमुख मतदारसंघांमधून सुरुवातीचे कल समोर येऊ लागले आहेत. सकाळी १०:४० पर्यंत अभिनेते विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वाधिक १०२ जागांवर आघाडीवर होता. त्यानंतर विरोधी पक्ष डीएमके ७४ जागांच्या आघाडीसह दुसऱ्या स्थानी होता, तर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या पक्षाची ५१ जागांसह तिसऱ्या स्थानी घसरण झाली.

सुरुवातीच्या कलानुसार, पक्ष तिसऱ्या क्रमांकावर घसरल्याचे पाहूण सत्ताधारी डीएमके पक्षाचा एका कार्यकर्त्याला त्याचे आश्रू रोखता आले नाहीत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना डीएमके चा हा कार्यकर्ता भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

तिरंगी लढत

२३४ जागांच्या तमिळनाडू विधानसभेसाठीच्या या लढतीत, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी ‘सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स’ सत्तेची दुसरी सलग टर्म मिळवण्याच्या प्रयत्नात होती. त्यांच्यासमोर पुन्हा एकत्र आलेल्या एआयडीएमके-भाजपा युतीचे आव्हान होते. या युतीने एडप्पाडी के. पलानीस्वामी यांना आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते.

राज्याच्या पारंपारिकपणे द्विपक्षीय असलेल्या राजकारणात, अभिनेता-राजकारणी विजय आणि त्यांचा पक्ष ‘तमिळगा वेट्री कझगम’ (TVK) यांनी दोन्ही पक्षांना आता यशस्वीपणे आव्हान दिल्याचे दिसत आहे.

बहुमताचा आकडा

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी, एखाद्या पक्षाला एकूण ११८ जागांची आवश्यकता आहे. २०२१ च्या मागील विधानसभा निवडणुकांमध्ये, एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील ‘डीएमके’ने एकूण १३३ जागा जिंकल्या होत्या, तर एआयडीएमके ने ६६ जागांसह प्रमुख विरोधी पक्ष ठरली होती.

‘पी-मार्क’, ‘मॅट्रिझ’ आणि ‘चाणक्य’ यांसारख्या बहुतांश एक्झिट पोल्सनी डीएमके मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एआयडीएम के असेल, ज्यांना ६० ते १०० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, एका प्रमुख एक्झिट पोलमध्ये आश्चर्यकारक निकालाचा अंदाज वर्तवला होता. ज्यामुळे अभिनेते विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून उदयास येईल असे म्हटले होते.