जयंत सिन्हांसह जय शहाचीही चौकशी करा : यशवंत सिन्हा

पॅराडाईज पेपरप्रकरणात जयंत सिन्हा यांचे नाव समोर आले आहे.

Yashwant Sinha , Duryodhana, PM Modi, Amit Shah, GDP, Business news, Dushasan , Indian economy , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
Yashwant Sinha: ज्या नेत्यांची नावे पॅराडाईज पेपरमध्ये आली आहेत. त्यांची सर्वांत आधी म्हणजे एक महिन्याच्या आत चौकशी केली जावी आणि संबंधित राजकीय व्यक्ती दोषी आहे किंवा नाही यांची जनतेला माहिती द्यावी, असे ते म्हणाले.
देशातील आर्थिक परिस्थितीवरून भाजपलाच कोंडीत पकडणारे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पॅराडाईज पेपरप्रकरणी जर जयंत सिन्हा यांची चौकशी सुरू झाली तर त्याचवेळी जय शहाचीही चौकशी केली जावी. केंद्र सरकारने एका महिन्याच्या आत याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना केली.

ज्या नेत्यांची नावे पॅराडाईज पेपरमध्ये आली आहेत. त्यांची सर्वांत आधी म्हणजे एक महिन्याच्या आत चौकशी केली जावी आणि संबंधित राजकीय व्यक्ती दोषी आहे किंवा नाही यांची जनतेला माहिती द्यावी, असे ते म्हणाले. जर जयंत सिन्हा यांची चौकशी करणार असाल तर मग जय शहाची चौकशी का केली जात नाही. त्याला तर न्यायालयात जाऊन खटला दाखल करण्यास सांगितले आहे. सर्वांचीच याप्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणीही यशवंत सिन्हा यांनी केली.

यशवंत सिन्हा यांच्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरोधात वक्तव्ये केली आहेत. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नोटाबंदी ही जल्लोष करण्यासारखी बाब नसल्याचे म्हटले. अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतरच देशात किती काळा पैसा आहे, हे समजेल. उगाच हवेत गप्पा मारून काहीही उपयोग नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Do enquiry of jayant sinha also jay shah says yashwant sinha