अणु पुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताला चीनमुळेच प्रवेश मिळू शकला नाही, असा चुकीचा प्रचार करून आमची बदनामी करु नये, असे मत चीनमधील ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमामधून व्यक्त करण्यात आले आहे. भारताकडून प्रत्येक गोष्टीचे सोयीस्कर अर्थ काढण्यात येत असल्याचे वृत्तपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे.  भारतीय जनता एनएसजीचे अपयश पचवू शकलेली नाही. भारतीय प्रसारमाध्यमांनीही चीनलाच दोषी ठरवले आहे. चीन हा भारतविरोधी आणि पाकधार्जिणा असल्याचा प्रचार सुरू आहे. चीनची अशी बदनामी करण्यापेक्षा भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
भारतातील राष्ट्रवाद्यांनी नीट वागायला शिकले पाहिजे- चीन 
भारतास आण्विक इंधन पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) सदस्य म्हणून प्रवेश न मिळू देण्यामागे चीनने कळीची भूमिका बजावली होती. मात्र क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण करार व्यवस्थेचे (एमटीसीआर) सदस्यत्व भारतास मिळाल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. चीनला मोठ्या राजनैतिक प्रयत्नानंतरही एमटीसीआरचे सदस्यत्व मिळविण्यात यश आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या माध्यमामधून गेल्या काही दिवसांपासून भारतास लक्ष्य करण्यात येत आहे.