आसाम: ईदीला हिंदूंसाठी मातेसमान गायींचा बळी देऊ नका, बद्रुद्दिन अजमलांचे मुस्लिमांना आवाहन | do not kill cow for kurbani this eid big statement from AIUDF chief badruddin ajmal rmm 97 | Loksatta

आसाम: ईदीला हिंदूंसाठी मातेसमान गायींचा बळी देऊ नका, बद्रुद्दिन अजमलांचे मुस्लिमांना आवाहन

ईदच्या दिवशी हिंदूंसाठी मातेसमान असणाऱ्या गायींचा बळी देऊ नका, असं आवाहन AIUDF चे सर्वेसर्वा बद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे.

आसाम: ईदीला हिंदूंसाठी मातेसमान गायींचा बळी देऊ नका, बद्रुद्दिन अजमलांचे मुस्लिमांना आवाहन
AIUDF चे सर्वेसर्वा आणि आसाम राज्य जमीयत उलामाचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल

ईदच्या दिवशी हिंदूंसाठी मातेसमान असणाऱ्या गायींचा बळी देऊ नका, असं आवाहन AIUDF चे सर्वेसर्वा आणि आसाम राज्य जमीयत उलामाचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे. अजमल यांच्या या विधानानंतर सोशल मीडियात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी त्यांच्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे.

माध्यमांशी बोलताना अजमल म्हणाले की, “देशात बहुसंख्य सनातन धर्म आहे. त्यामुळे इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्यांनी ईदच्या दिवशी गायींचा बळी देऊन सनातन धर्मियांच्या भावना दुखवू नये. ईदच्या दिवशी कुर्बानी देण्यासाठी गायीचा बळी देणं अनिवार्य नाही. देशातील बहुतांशी आपले बांधव हे सनातन किंवा हिंदू धर्मातील आहेत. ते गायीला आपल्या मातेसमान मानतात, त्यामुळे मुस्लिमांनी गायींचा बळी कशासाठी द्यायचा? ईदीला मुस्लिमांनी गायींचा बळी देऊ नये,” असं आवाहन बद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे.

धुबरी येथील लोकसभा खासदार यांनी रविवारी सांगितलं की, “इस्लाममध्ये, कीटक, कुत्रा किंवा मांजर यांना वेदना देण्यास देखील परवानगी नाही. कोणी मांजर किंवा कुत्र्याला हानी पोहोचवत असेल तर त्याला स्वर्गात स्थान मिळत नाही.” याशिवाय अजमल यांच्या विधानाबाबत बोलताना आसाम पीसीसीचे अध्यक्ष भूपेन कुमार बोराह म्हणाले की, “बद्रुद्दीन अजमल हे एक राजकीय नेता असण्यासोबतच ते मौलाना देखील आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करून गोहत्या न करण्याचं आवाहन केलं असावं. ”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
IndiGo flights :…म्हणून ५५ टक्के इंडिगो विमानांचे उशीराने उड्डाण; ‘डीजीसीए’ चौकशी करणार

संबंधित बातम्या

राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”
“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”
Video: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय? सांगत आहेत गिरीश कुबेर…
Gujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा
FIFA WC 2022: ‘कबूतर नृत्य’! लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल
गाय नव्हे माय! निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video
मुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक
ENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ