नवी दिल्ली : ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी, करोनाच्या या उत्परिवर्तित विषाणूचा संसर्ग म्हणजे सर्दीचा आजार नव्हे, हे लक्षात घेऊन लोकांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे, असा इशारा करोना कृती गटाचे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी गुरुवारी दिला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ३०० जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असून संसर्गदरही ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात ३० डिसेंबर रोजी करोनाचा संसर्गदर १.१ टक्के होता, तो १२ जानेवारी रोजी ११.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. या आकडेवारीवरून करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाटय़ाने होऊ लागल्याचे स्पष्ट दिसते. जगभरात ओमायक्रॉनमुळे ११५ रुग्ण तर, भारतात एक रुग्ण दगावला आहे. त्यामुळे ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करू नये, असे पॉल म्हणाले. लसीची एकही मात्रा न घेतलेल्या अनेकांना करोनाचा संसर्ग होत असून त्यांना रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. पूर्ण लसीकरण झालेल्या ७८ टक्के लोकांमध्ये करोनासंसर्ग होण्याची शक्यता कमी होते. दोन्ही मात्रा घेतलेल्या ९०-९५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत नसल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे लोकांनी प्राधान्याने करोना प्रतिबंधक लस घ्यावी, असेही पॉल म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not treat omicron as common cold govt warns zws
First published on: 13-01-2022 at 01:38 IST