Vishwajit Rane Apology Rejected by Doctor : गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचा गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टरांना फटकारतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर राणे यांच्यावर विरोधकांकडून चांगलीच टीका केली जात होती. यादरम्यान राणे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी देखील मागितली. मात्र मंत्र्यांनी मागितलेली ही माफी डॉक्टरांनी नाकारली आहे.

डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी राणे यांनी मागितलेली माफी ही ‘स्टुडिओ माफी’ असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी शनिवारी कॅज्युअल्टी विभागात ज्या ठिकाणी मंत्र्यांनी त्यांना फटकारले होते त्याच ठिकाणी त्यांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी देखील डॉक्टरांनी केली आहे.

“मंत्र्यांनी कॅज्युअल्टी विभागात यावे आणि त्याच ठिकाणी जाहीरपणे माफी मागावी,” असे कुट्टीकर द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले आहेत.

डॉक्टरांनी मंत्र्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये ज्या पद्धतीचे वर्तन केले त्याविरोधात डॉक्टरांकडून आंदोलन केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी सोमवारी सकाळी माफी माहितली आहे. दरम्यान कुट्टीकर यांनी सोमवारी दुपारी जीएमसी येथे माध्यमांशी बोलताना मंत्र्‍यांनी २४ तासाच्या आत पहिली घटना घडली त्या ठिकाणी येऊन माफी मागीतली पाहिजे असे सांगितले.

राणे यांनी माफी मागितल्याबद्दल बोलताना कुट्टीकर म्हणाले की, “मी व्हिडीओ पाहिला आहे, पण ती एक स्टुडिओ माफी आहे…सर्व डॉक्टरांचा मागणी आहे की घटना जिथे घडली तेथेच माफी मागीतली पाहिजे… लोकांच्या समोर. जेणेकरून ते रेकॉर्ड केले जाऊ शकेल. माझा अपमान जसा व्हायरल झाला, तसेच हे (माफी) देखील व्हायरल होईल. माझा त्या दिवशी पूर्णपणे अपमान करण्यात आला… त्यामुळे, मला वाटते की सर्वांना माफीबद्दल माहिती असले पाहिजे. २४ तासांच्या आत त्यांना माफी मागावीच लागेल.”

नेमकं काय झालं होतं?

शनिवारी घडलेल्या घटनाक्रमाबद्दल सांगताना कुट्टीवार म्हणाले की, “कोणीतरी रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये आले आणि त्याने नातेवाईकाला व्हिटॅमिन बी१२ इंजेक्शन देण्यास सांगितले. “बी१२ इंजेक्शन हे काही एमर्जन्सी इंजेक्शन नाही. त्यामुळे आम्ही म्हणालो की तुम्ही ओपीडीमध्ये किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जा. टर्शरी केअर रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये फक्त गंभीर आणि क्रिटिकल रुग्णांवर उपचार केले जातात, त्यामुळे हा प्रोटोकॉल आहे. पण सध्या साधी प्रकरणे देखील एमर्जन्सी विभागात येतात.” तसेच ते म्हणाले की जर त्यांची प्रत्यक्षात येऊन माफी मागावी ही मागणी मान्य केली गेली नाही तर संप केला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सोमवारी सकाळी या प्रकरणी रुग्णालयाच्या बाहेर डॉक्टरांनी घोषणाबाजी केली आणि मंत्र्‍यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी देखील केली. या आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की मंगळवारी संप किंवा आरोग्य सेवा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.