चेन, स्क्रू आणि ब्लेडच्या तुकड्यांसह तब्बल ६५ वस्तू गिळल्याने उत्तरप्रदेशच्या हाथरस येथील १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पाच तास शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टरांनी मुलाच्या पोटातून या वस्तू बाहेर काढल्या. पणउपाचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. आदित्य शर्मा असं या मुलाचं नाव आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आदित्यने १३ ऑक्टोबर रोजी त्याला श्वास घेताना त्रास होत असल्याचं त्याच्या वडिलांना सांगितलं. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला आग्रातील एका रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्याला पुन्हा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला जयपूरमधील एका रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथेही निदान न झाल्याने त्यांनी त्याला अलीगढमधील एका रुग्णालयात नेलं.

Kanpur Crime News
Kanpur : धक्कादायक! महिलेची हत्या करून मृतदेह ‘व्हिआयपी’ परिसरात पुरला; चार महिन्यांनी ‘असं’ उलगडलं घटनेचं रहस्य
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Delhi crime News
Delhi : धक्कादायक! टोपीवरून झालेल्या वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या; आरोपीच्या आईने पुरवली बंदूक
Iranian university hijab protest
Iran Hijab Protest: हिजाब सक्तीच्या विरोधात विद्यार्थीनीचं निर्वस्त्र होत आंदोलन; व्हिडीओ व्हायरल होताच विद्यापीठानं केली कारवाई
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Analog Space Mission :
Analog Space Mission : भारताची पहिली ॲनालॉग स्पेस मिशन लडाखमध्ये सुरू; इस्रोची ही अंतराळ मोहीम काय आहे?
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा – जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींच्या आलं अंगात; शाळेबाहेर येऊन असं काही करू लागल्या… VIDEO पाहून नेटकरी झाले अवाक्

अलीगढमध्ये डॉक्टरांनी त्याचे सीटी स्कॅन केल्यानंतर श्वसननलिकेत ब्लॉकेज असल्याचे आढळून आलं. त्याच रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, दोन-तीन दिवसांनी पोट दुखू लागल्याने त्याची अल्ट्रासाऊंड चाचणी करण्यात आली. त्यात मुलाच्या पोटात १९ वस्तू असल्याचे आढळून आलं. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला नोएडा येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

नोएडा येथील एका खासगी रुग्णालायात दाखल केल्यानंतर त्याची पुन्हा एकदा अल्ट्रासाऊंड चाचणी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी मुलाच्या पोटात ४९ वस्तू असल्याचे सांगितलं. तसेच त्याला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात रेफर करण्यात आलं. तिथे पुन्हा अल्ट्रासाऊंड चाचणी केल्यानंतर मुलाच्या पोटात ६५ वस्तू असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – धक्कादायक! फटाक्यामुळे धावत्या रिक्षाला लागली भररस्त्यात आग, संभाजीनगरचा VIDEO होतोय व्हायरल

दरम्यान, डॉक्टरांनी त्याच्यावर पाच तास शस्त्रक्रीया करत या वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपाचारादरम्यान पोटात इन्फेक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात बोलताना मुलाने लहानपणी या वस्तू गिळल्या असाव्यात, असं डॉक्टरांनी सांगितलं.

Story img Loader