ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (ABC) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारवर एक वादग्रस्त माहितीपट प्रसिद्ध केला आहे. पत्रकार आणि माहितीपटाची अँकर अवनी डायस यांच्या शब्दात या माहितीपटाचा उद्देश “ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा हस्तक्षेप उलगडणे” हा आहे. माहितीपटात अनेक दावे करण्यात आले असून ऑस्ट्रेलियाच्या “राष्ट्रीय सुरक्षा” मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला गेले असल्याचे म्हटलं आहे. मात्र, डॉक्युमेंटरीमध्ये कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. महत्त्वाचं म्हणजे, या त्याच अवनी डायस आहे ज्यांना भारतात वार्तांकन करण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. “Spies, secrets and threats: How the Modi regime targets people overseas” (हेर, गुपित आणि धमक्या : मोदी सरकार परदेशातील लोकांना कसं लक्ष्य करतात), या आशयाने हा माहितीपट प्रसारित करण्यात आला आहे.

भारतात १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली. भारतातील निवडणूक प्रक्रियेचं वार्तांकन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पत्रकार अवनी डायस भारतात आल्या होत्या. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा एक माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटाची सुरुवात मोदींच्या मोठ्या कटआऊटने होती. नंतर या डॉक्युमेंटरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरएसएसशी संबंध असल्याचं सांगितलं आहे. माहितीपटात आरएसएसचे वर्णन “हिंदू राष्ट्रवादी संघटना” असे केले आहे. डॉक्युमेंटरीमध्ये अॅडलेड विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापिका प्रिया चाको यांनी आरएसएसला अत्यंत उजवी निमलष्करी संघटना म्हणून संबोधलं आहे. त्यांनी डॉक्युमेंटरीमध्ये असेही म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्याचार झाले. “निमलष्करी प्रशिक्षण आणि प्रबोधन” याचा RSS शी दीर्घकाळ संबंध आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Mumbai North West Lok Sabha Constituency result, Vanrai Police Register Case Against Thackeray Group MLA, Entry Violation at Counting Center Mumbai North West seat, amol kirtikar, ravindra waikar,
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ निकाल प्रकरणाला नवे वळण, ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
Saurabh Netravalkar Exclusive Interview
“मला रंगांधळा म्हणत त्यांनी..”, सौरभ नेत्रावळकरने सांगितला भारत सोडण्याआधीचा किस्सा; म्हणाला, “दोन वर्षं मागितली..”
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Rahul gandhi
राहुल गांधींचा लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदास नकार? ‘या’ तीन तडफदार नेत्यांच्या नावांची चर्चा
CM Arvind Kejriwal
मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर; ईडीला न्यायालयाकडून झटका
Assam Shocker! Mother Forces Her 20-Month-Old-Child To Smoke Cigarette,
या बाईला आई म्हणायचं? २० महिन्यांच्या बाळाला करायला लावलं धूम्रपान आणि मद्यही पाजलं, कुठे घडला प्रकार?

हेही वाचा >> भारतातील निवडणुकीचं वार्तांकन करण्याची परवानगी ऑस्ट्रेलियन पत्रकाराला नाकारली? सरकारने स्पष्ट केली भूमिका

“आज, आम्ही नरेंद्र मोदी सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या ऑस्ट्रेलियातील घुसखोरीबद्दलचा आमचा तपास जाहीर करत आहोत. देश सोडण्यास सांगितले गेलेल्या भारतीय हेरांनी यापूर्वी कधीही उघड न केलेले तपशील समाविष्ट आहेत”, असं अवनी दास म्हणाल्या.

या माहितीपटात एक अत्यंत वादग्रस्त भागही आहे. यामध्ये खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत पन्नून यानेही त्यांचं मत मांडलं आहे. डॉक्युमेंट्रीमध्ये अनेक खलिस्तानी समर्थक व्यक्तींच्या विषयावर देखील चर्चा करण्यात आली आहे. “अलिप्ततावादी चळवळीशी संबंधित असलेल्या ऑस्ट्रेलियातील अनेक लोकांशी बोलून हा माहितीपट तयार करण्यात आला आहे”, असाही दावा करण्यात आला आहे.

परकीय हस्तक्षेप आणि परदेशात असंतुष्टांची हत्या

“नरेंद्र मोदींनी एक दशक भारतावर राज्य केले आहे आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालानुसार ते पुन्हा एकदा सत्तेवर बसले आहेत. ते त्यांच्या टीकाकारांना सहनही करत नाहीत. त्यांच्या सरकारवर परकीय हस्तक्षेप आणि परदेशात असंतुष्टांची हत्या केल्याचा आरोप आहे. आता फोर कॉर्नर्सने त्यांच्या हस्तक्षेपाचा पर्दाफाश केला आहे”, असं युट्यूबवरील माहितीपटातील परिचयात आहे.