रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशियाच्या विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करत असल्याचं सांगितलं असून या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले आहेत. मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेले पुतिन हे वेळोवेळी समोर येऊन उघडपणे आपली भूमिक मांडताना दिसतायत. पण या साऱ्या गोंधळामध्ये आणखीन एक चर्चेत आलेला मुद्दा आहे, तो म्हणजे पुतिन हे इंग्रजी बोलतात का?

सामान्यपणे राष्ट्रीय सत्रावरील नेत्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी चर्चा करावी लागते. मात्र अनेकदा नेत्यांना स्वत:ची मातृभाषा वगळता इतर भाषा फार प्रभावीपणे बोलता येत नाहीत. त्यातही सध्या निर्माण झालेल्या युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या नजरा पुतिन यांच्यावर असताना ते नेमक्या कोणत्या भाषा बोलतात यासंदर्भात आता जगभरामध्ये सर्च केलं जातंय. काही दिवसांपूर्वीच देशाला संबोधित करताना युक्रेनमधील बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता देत असल्याचं त्यांनी रशियन भाषेत भाषण देताना सांगितलं. मात्र रशियन भाषेसोबतच ते जर्मनही व्यवस्थित बोलू शकतात. मागील काही वर्षांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी आपण इंग्रजीमध्येही उत्तम प्रकारे संवाद साधू शकतो हे दाखवून दिलंय.

no permission for fodder camps to curb corruption
यंदा चारा छावण्यांना परवानगी नाही; भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय? 
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

रशिया-युक्रेन संघर्षातील जर्मन दुवा – काय आहे नॉर्ड स्ट्रीम-२ पाइपलाइन?

पुतिन यांची सेकेण्ड लँगवेज म्हणजेच ते प्राधान्यक्रम देताना बोलतानाची भाषा जर्मन आहे. जर्मन बोलल्या जाणाऱ्या देशांमध्ये दौऱ्यावर असताना ते आवर्जून या भाषेत बोलतात. १९८० दरम्यान सोव्हिएतकडून सुरक्षा दलामधील जवान म्हणून जर्मनीत तैनात असताना ते दैनंदिन जीवनामध्ये ही भाषा वापरायचे. द गार्डियनच्या वृत्तानुसार नंतर पुतिन यांनी जर्मन चान्सलर गेरहार्ड श्रोडर यांच्यासोबतच्या मैत्रीदरम्यान जर्मन भाषा अधिक चांगल्या पद्धतीने आत्मसात केली.

रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर भारतावर काय परिणाम होतील?

पुतिन हे उत्तम प्रकारे इंग्रजी बोलू शकतात. पुतिन यांच्या प्रवक्त्यांनीच ही माहिती दिली होती. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पुतिन स्वत: दुभाषकाचा वापर न करता इंग्रजीमधून म्हणणं मांडतात. “त्यांना इंग्रजी समजतं आणि अनेकदा ते दुभाषकालाही त्याच्या चूका दाखवून देतात,” असं त्यांचे प्रवक्ते डिमेट्री पेकोव्ह म्हणाले होते.

२०१३ साली पुतिन यांनी २०२० मधील वर्ल्ड एक्स्पो आयोजित करण्याची संधी देण्यात यावी यासाठीचं भाषण इंग्रजीमध्ये केलेलं. २०१७ मध्ये एका महत्वाच्या मुलाखतीमध्ये पुतिन हे इंग्रजी आणि रशियन भाषेमध्ये बोलताना दिसले. २०१० साली त्यांनी सेंट पीटर्सबर्गमध्ये लहान मुलांसाठी मदतनिधी गोळा करण्याच्या कार्यक्रमात इंग्रजीत भाषण दिल्याचा आणि नंतर इंग्रजीमध्ये गाणं गायल्याचा व्हिडीओ चांगलाच गाजला होता.

एकंदरितच पुतिन यांना रशियन भाषेसोबतच जर्मन आणि इंग्रजीचंही चांगलं ज्ञान असल्याचं अनेकदा दिसून आलंय.