आज स्वयंपाक गॅसच्या किंमतीमध्ये पुन्हा ५० रुपयांची वाढ झाल्याने काँग्रेसने या मुद्द्यावरुन केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. “केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका दिला आहे. या भाववाढीने गॅस सिलेंडर १०५० रुपये झाला आहे. एवढा महाग गॅस घेणे किती लोकांना परवडणार आहे?,” असा सवाल विचारत ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा’ हा मोदी सरकारचा नवा नारा बनला आहे, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> Gas Cylinder Price Hike: स्वयंपाकाचा गॅस आजपासून महागला; जाणून घ्या नवे दर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाईचा आलेख वाढतच आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भावही सामान्यांच्या हाताबाहेर गेले आहेत. तर गॅसचा भाव सातत्याने वाढवून आता तो १०५० रुपये झाला आहे. काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या काळात २०१४ साली हाच गॅस सिलेंडर ४५० रुपयांना मिळत होता,” असं पटोले यांनी मोदी सरकावर टीका करताना म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Domestic lpg gas cylinder rate increases across the country nana patole slams modi government scsg
First published on: 06-07-2022 at 16:38 IST