Donald Trump Nobel Peace Prize medal : नोबेल शांतता पुरस्कार मिळण्याच सुप्त इच्छा असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचं अखेर स्वप्न पूर्ण झालं आहे. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना मिळालेला शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना देऊ केला आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसमधअये झालेल्या बैठकीत पुरस्कारासोबत येणआरं सुवर्णपदकही देण्यात आलं. गेल्या महिन्यात मचाडो यांना हा पुरस्कार मिळाला होता. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मारियाने माझ्या कामासाठी मला तिचा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केला. परस्पर आदराचे हे अद्भुत उदाहरण आहे. धन्यवाद मारिया!” तर, माचाडो यांनी ही बैठक उत्कृष्ट असल्याचे वर्णन केले परंतु अधिक तपशील दिले नाहीत. त्यांनी सांगितले की हे पदक ट्रम्प यांच्या व्हेनेझुएलाच्या लोकांच्या स्वातंत्र्याप्रती असलेल्या वचनबद्धतेची ओळख पटवणारे एक संकेत आहे.

नोबेल पुरस्कार हस्तांतरित करता येत नाही

नोबेल शांतता पुरस्कार कोणालाही हस्तांतरित करता येत नाही, किंवा काढूनही घेतला जाऊ शकत नाही असं नॉर्वेजिअन नोबेल संस्थेने म्हटलं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना ही पदवी दिली असली तरीही ते सुवर्णपदक मचाडो यांच्याकडे राहणार की ट्रम्प यांच्याकडे राहणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला जेव्हा ट्रम्प यांना विचारले गेले की त्यांना हा पुरस्कार हवा आहे का, तेव्हा त्यांनी रॉयटर्सला सांगितले, “नाही, मी तसं म्हणायचं नव्हतं. तिला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.”

“मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नोबेल शांतता पुरस्कार पदक प्रदान केले,” असे मचाडो यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यांनी सांगितले की ही कृती आपल्या स्वातंत्र्याप्रती असलेल्या त्यांच्या अद्वितीय वचनबद्धतेची ओळख म्हणून होता.

व्हाईट हाऊसने आधी सांगितले होते की जर मचाडो यांनी ट्रम्प यांना पदक देण्याचा प्रयत्न केला तर ते स्वीकारायचे की नाही हे राष्ट्राध्यक्षांवर अवलंबून असेल. नोबेल इन्स्टिट्यूटने यापूर्वी स्पष्ट केले आहे की भौतिक पदक इतरांना देता येतं, परंतु नोबेल शांतता पुरस्काराची पदवी हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. दरम्यान, नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याची इच्छा अनेकदा जाहीरपणे व्यक्त करणारे ट्रम्प यांनी या बैठकीबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.