वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या ५ नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या अध्यक्षपद निवडणुकीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात देशातील श्रीमंतांवरील कर आकारणी तसेच अर्थव्यवस्थेला चालना कशी द्यायची, यावरून मतभेद असल्याचे समोर आले आहे. वादविवाद सत्राच्या एक आठवड्यापूर्वी कोणता उमेदवार मध्यमवर्गीयांसाठी काय करू शकतो, याबद्दल प्रभावी आर्थिक संदेश देण्याचे प्रयत्न ट्रम्प आणि हॅरिस करीत आहेत.

हॅरिस बुधवारी पोर्ट्समाउथ, न्यू हॅम्पशायर येथे त्यांच्या धोरणात्मक योजनांवर चर्चा करणार आहेत. तर ट्रम्प गुरुवारी ‘इकॉनॉमिक क्लब ऑफ न्यूयॉर्क’ला संबोधित करतील. दरम्यान, अमेरिकन नागरिक कर कपात करताना ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेची इच्छाही व्यक्त करतात, असा दावा ट्रम्प यांनी केलो. तसेच ही कर कपात इतकी विलक्षण असेल, की अर्थव्यवस्थेच्या तुटीबद्दल काळजी करण्यासारखे नाही, असेही ते म्हणतात. त्यांच्या कल्पनांचे बहुतेक आर्थिक विश्लेषण चुकीचे ठरेल, अशीही त्यांना अपेक्षा आहे.

Plight of passengers as TMT buses
मोदी यांच्या सभेमुळे प्रवाशांचे हाल; टीएमटीच्या बसगाड्या सभेसाठी वळविल्या, सॅटील पुलावर प्रवाशांच्या रांगा
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Hindenburg on Madhabi Puri Buch
‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना संसदेच्या लोकलेखा समितीचे समन्स; हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी होणार?
Salil Ankola Former Indian Cricketer Mother Found Dead in Pune Flat Wound Marks Found on Neck
Salil Ankola: माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, गळ्यांवर जखमांच्या खूणा
ie thinc fourth edition
‘हवामान बदल थोपवण्यासाठी निधीची गरज’
Four Assistant Commissioners appointed to Panvel Municipalitys ward offices
सहाय्यक आयुक्तांच्या नियुक्त्या, पनवेलकरांच्या सोयीसाठी अधिकाऱ्यांचे क्रमांक जाहीर
First photo of British Prime Minister Keir Starmer's new cat
इंग्लडच्या पंतप्रधानांच्या मांजरीचंही कौतुक; एक्सवर व्हायरल होतोय फोटो
Ashka goradia
Aashka Goradia : टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्रीने उभारला ८०० कोटींचा व्यवसाय, ट्रोल झाल्यामुळे सोडली होती सिनेइंडस्ट्री!

हेही वाचा >>>धूम-२ चित्रपटाची नक्कल करून १५ कोटींचे सोने चोरण्याचा प्रयत्न; पण खिडकीतून उडी मारताना पडला अन्…

अतिश्रीमंत तसेच मोठ्या कंपन्यांनी अधिक कर भरावा. त्यापासून मिळणाऱ्या महसुलाचा वापर तीन दशलक्ष घरांच्या बांधकामासाठी, तसेच पालकांना कर सवलत देण्याची इच्छा कमला हॅरिस यांनी व्यक्त केली आहे. जो बायडेन जी धोरणे कायमस्वरूपी राबवण्यात असमर्थ ठरले, त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, प्रतिष्ठित संस्थांनी ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेक्षणात, ४५ टक्के नागरिक म्हणाले, की ट्रम्प अर्थव्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे हाताळतील. तर ३८ टक्के नागरिकंनी हॅरिस यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.