अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याची शुक्रवारी सांगता झाली. चीनमधून निरोप घेण्यापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एक भेट दिली. जिनपिंग यांनी ट्रम्प यांना आपल्या १५०० एकरच्या झोंगनानहाई या परिसराची सफर घडवली. परिसराची माहिती देताना जिनपिंग यांनी त्यांचे सरकारी अधिकारी आणि पक्षनेते येथेच काम करतात आणि राहतात असेही सांगितले. ट्रम्प देखील या भेटीबद्दल ट्रम्प उत्साही असल्याचे दिसून आले.

जिनपिंग यांनी ट्रम्पना घडवली खास परिसराची सफर

चीनमधून निरोप घेण्यापूर्वी ट्रम्प यांनी जिनपिंग यांच्या भेटीच्या कौतुक केले. “मी जिनपिंग यांच्या घरी गेलो होतो, ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. लोकांनी हे यापूर्वी हे कधीही पाहिले नाही, खरंच आश्चर्यकारक आहे,” अशा शब्दात ट्रम्प यांनी झोंगनानहाई या परिसराचे कौतुक केले. असे असले तरी ट्रम्प यांचा चीन दौरा फारसा सुरळीत पार पडला नाही, अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकन पत्रकार आणि अधिकाऱ्यांसोबत झालेल्या गैरवर्तनाच्या काही घटना उघडकी आल्या, पण याबाबत अमेरिकेने अद्याप केलेले नाही.

ट्रम्प यांचा चीनमध्ये अपमान?

डोनाल्ड ट्रम्प चीनमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यासाठी विमानतळावर रेड कार्पेट आणि लष्करी मानवंदना देण्यात आली. पण, चिनी राष्ट्राध्यक्षांनी या समारंभाला दांडी मारली होती. विमानतळावर शी जिनपिंग यांनी स्वतः ट्रम्प यांचे स्वागत करण्याऐवजी, चीनचे उपराष्ट्रपती आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले होते. जिगपिंग यांनी एकप्रकारे अमेरिका आणि ट्रम्प यांचा अपमानच केल्याचे मत आता या भेटीचे विश्लेषक मांडत आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्यासोबत चीन दौऱ्यावर परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, संरक्षण सचिव पीट हेगसेथ, इलॉन मस्क आणि टिम कुक देखील गेले होते.

किम जोंग उन यांच्या स्वागताचा व्हिडीओ व्हायरल

राजकीय भाष्यकार ब्रायन ॲलन यांनी एक्स सोशल मीडियावर याबाबत मत व्यक्त केले आहे. “मोठा अपमान! ट्रम्प नुकतेच चीनमध्ये उतरले आहेत. जिनपिंग यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले नाही. त्याऐवजी, अमेरिकेचे राजदूत, चीनचे उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रालयाचे दोन अधिकारी उपस्थित होते. चीन अमेरिकेला तिसऱ्या जगातील देशासारखी वागणूक देत आहे,” असे ॲलन म्हणाले.

किम जोंग यांच्या स्वागताचा जुना व्हिडीओ

दरम्यान, २०१८ मध्ये जिनपिंग यांनी चीन दौऱ्यावर आलेल्या उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांचे विमानतळावर स्वतः स्वागत केले होते, याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.