नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर काल २० जानेवारी रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. या शपथविधीनंतर सर्वत्र त्यांच्या कुटुंबाविषयी चर्चा सुरू झाली आहे. तीन वेळा विवाह केलेल्या ट्रम्प यांना सध्या ५ मुलं आणि १० नातवंडे आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचे आई-वडील

१४ जून १९४६ रोजी जन्मलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वडिलांचे नाव फ्रेडरिक क्राइस्ट ट्रम्प असे होते. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेले फ्रेडरिक ट्रम्प यांचे वडील जर्मन स्थालांतरित म्हणून आले होते. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या आईचे नाव मेरी अ‍ॅन मॅकलिओड ट्रम्प असे होते. त्यांचा जन्म स्कॉटलंडमध्ये झाला होता आणि त्या १९३० मध्ये स्थलांतरित म्हणून अमेरिकेत आल्या होत्या. वडील डोनाल्ड फ्रेडरिक सी. ट्रम्प हे न्यू यॉर्कमधील रिअल इस्टेट डेव्हलपर होते.

अमेरिकेने रवाना केलेल्या भारतीयांचे मायदेशी परतल्यावर काय होणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Indian Immigrants : अमेरिकेने रवाना केलेल्या भारतीयांचे मायदेशी परतल्यावर काय होणार?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Trump is using expensive military planes for deportation
बेकायदेशीर स्थलांतरितांची घरवापसी करण्यासाठी अमेरिका ५ पट महाग लष्करी विमाने का वापरत आहे?
Nitin Kamath On Donald Trump Tariff Wars
Nitin Kamath : “असं वाटतंय की आपण सगळे अमेरिका साम्राज्याचे भाग आहोत”, नितीन कामथ यांची ट्रम्प यांच्या ‘टेरिफ’ धोरणांवर टीका
Dance kaka ajoba
लग्नात काका अन् आजोबांनी केला झिंगाट डान्स! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “प्रत्येक लग्नात एक तरी नातेवाईक….”
U S President Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, सीएफपीबीचे संचालक रोहित चोप्रा यांना पदावरून हटवलं
Kash Patel DOnald Trump
“जय श्री कृष्ण” म्हणत FBI च्या नव्या संचालकांचं सीनेट बैठकीत भाषण; आई-वडिलांच्या सन्मानार्थ केलेल्या कृतीने वेधलं लक्ष
Image Of Doanald Trump.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयांचा धडाका सुरूच, अमेरिकेत १९ वर्षांच्या आधी लिंगबदलास घातली बंदी

डोनाल्ड ट्रम्प यांची भावंडं

डोनाल्ड ट्रम्प यांना एकूण पाच भावंडे आहेत. त्यांची नावे मेरीअन ट्रम्प, फ्रेडरिक सी. ट्रम्प ज्युनियर, एलिझाबेथ जे. ट्रम्प आणि रॉबर्ट एस. ट्रम्प आहेत. यापैकी सध्या डोनाल्ड आणि बहीण एलिझाबेथ हेच जिवंत आहेत. मेरीअन ट्रम्प या अमेरिकेत अनेक वर्ष न्यायाधीश होत्या.

तीन विवाह

डोनाल्ड ट्रम्प यांचे पहिले लग्न इवाना ट्रम्प यांच्याशी झाले होते. त्या चेक-अमेरिकन मॉडेल होत्या. डोनाल्ड ट्रम्प आणि इवाना यांचे लग्न १९७७ मध्ये झाले होते. १९९२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. इवाना यांच्यापासून डोनाल्ड यांना तीन मुले झाली. त्यांची नावे डोनाल्ड ज्युनियर, एरिक आणि इवांका अशी आहेत. इवाना यांचे २०२२ मध्ये निधन झाले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या पत्नीनीचे नाव मार्ला मॅपल्स असे होते. त्यासुद्धा अभिनेत्री आणि मॉडेल होत्या. त्यांच्यापासून डोनाल्ड यांना टिफनी ट्रम्प नावाची मुलगी झाली. डोनाल्ड यांचे हे लग्न १९९३ ते १९९९ पर्यंतच टिकले.

डोनाल्ड ट्रम्प यांचे तिसरे आणि शेवटचे लग्न २००५ मध्ये मेलानिया ट्रम्प यांच्याशी झाले होते. मेलानिया ट्रम्प यांनीही फॅशन मॉडेल म्हणून काम केले आहे. त्यांच्यापासून डोनाल्ड यांना बॅरॉन नावाचा मुलगा आहे.

तीन पत्नींपासून ट्रम्प यांची मुलं

डोनाल्ड ट्रम्प यांना पाच मुलं आहेत, त्यापैकी मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर हे कायम वडिलांबरोबर असतात. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर हे ट्रम्प ऑर्गनायझेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष आहेत. डोनाल्ड यांची मोठी मुलगी इवांका ट्रम्प या आहेत. मॉडेल असेलेल्या इवांका यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात व्हाईट हाऊसमध्ये सल्लागार म्हणूनही काम केले आहे. त्यांना तीन मुले आहेत. इवांका यांचे पती जेरेड कुशनर हे ट्रम्प प्रशासनात वरिष्ठ सल्लागार राहिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा मुलगा एरिक ट्रम्प देखील त्यांच्या वडिलांचा रिअल इस्टेट व्यवसाय सांभाळतात. त्यांना दोन मुले आहेत. टिफनी ट्रम्प या एका विद्यापीठात संशोधन सहाय्यक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा धाकटा मुलगा बॅरन ट्रम्प अजून शिक्षण घेत आहे.

ट्रम्प यांची नातवंडं

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इवांका ट्रम्प व कुशनर जेरेड यांना अराबेला, जोसेफ आणि थियोडोर कुशनर अशी तीन मुलं आहेत. तर डोनाल्ड ज्युनिअर ट्रम्प यांना काई, डोनाल्ड तिसरा, ट्रिस्टन, स्पेन्सर आणि क्लो ट्रम्प पाच मुलं आहेत. तर एरिक आणि लारा ट्रम्प यांना दोन मुलं आहेत.

Story img Loader