Donald Trump On Steel Import : अमेरिकेतली अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर येत्या जानेवारी महिन्यात २० तारखेला ट्रम्प अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या घोषणा करण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भारतासह नऊ देशांचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ संघटनेला, अमेरिकन डॉलर कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्यास १०० टक्के आयात शुल्क लादण्यासह व्यापार बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आता ट्रम्प यांनी जगभरातील पोलाद उद्योगांची चिंता वाढवणारी घोषणा केली आहे.

भारतीय पोलाद कंपन्यांच्या पोलाद निर्यात मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. यातच अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी अमेरिकन पोलाद उद्योगांच्या रक्षणासाठी देशात आयात होणार्‍या पोलादावर आणखी शुल्क वाढवण्याचे संकेत दिले आहेत. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी जपानच्या निप्पॉन स्टील कंपनीला पेनसिल्वेनिया येथील पोलाद निर्मिती उद्योग यूएस स्टीलचे अधिगृहण करण्यापासून रोखणार असल्याचेही जाहीर केले आहे.

Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
donald trump s desire to acquire greenland
अन्वयार्थ : ट्रम्प यांचा ग्रीनलँडहट्ट
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
Farmers halted auctions in Lasalgaon demanding immediate cancellation of onion export duty
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
Donald Trump
Donald Trump : ‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! सर्व आरोपातून झाली बिनशर्त सुटका
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

अमेरिकेतील यूएस स्टील या स्थानिक पोलाद उद्योगाबाबद बोलताना ट्रम्प म्हणाले की, “कधीकाळीची महान आणि शक्तिशाली कंपनी यूएस स्टील, ही जपानच्या निप्पॉन स्टील या एका परदेशी कंपनीने विकत घ्यावी, याच्या मी पूर्णपणे विरोधात आहे. कर आणि शुल्कांमध्ये सूट देऊन आपण यूएस स्टील कंपनीला पुन्हा मजबूत आणि महान बनवूयात आणि हे अगदी वेगाने केले जाईल. राष्ट्राध्यक्ष म्हणून मी हा करार होण्यापासून थांबवेल. विकत घेणार्‍यानी सावध व्हावे”, अशी घोषणाच डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

भारतीय पोलाद उद्योग सध्या आव्हानांचा सामना करत आहे, अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. भारतीय पोलाद उद्योग सध्या निर्यातीमध्ये झालेली मोठी घट आणि देशात वाढलेली पोलादाची आयात या संकटांचा सामना करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारतातील पोलाद आयात ४१ टक्क्यांनी वाढली आहे, तर निर्यात ३६ टक्क्यांनी घटली आहे.

यादरम्यान वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तसेच पोलाद मंत्रालयाने पोलाद उद्योगाशी संबंधितांबरोबर सोमवारी एक बैठक घेतली, ज्यामध्ये पोलाद उद्योगाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये पोलाद उद्योगासमोरील आव्हाने लक्षात घेत मंत्रालयाने काही ठराविक पोलादी वस्तूंवर २५ टक्के सेफगार्ड ड्युटी लावण्याचा प्रस्ताव सादर केला.

हेही वाचा >> Bangladesh : बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी? न्यायालयात रिट याचिका दाखल

देशातील पोलाद उद्योग संकटात?

दरम्यान गेल्या महिन्यात पोलाद सचिव संदीप पौंड्रिक (Sandeep Poundrik) यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, देशातील पोलादाचा वापर वाढत आहे, याबरोबरच त्यांनी पोलाद उत्पादकांचा नफा मात्र कमी-कमी होत असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, “२०२४-२५ च्या पहिल्या सहा महिन्यात पोलाद वापरामध्ये १३ टक्के वाढ दिसून आली आहे. मागणीमध्ये कुठलीही कमतरता नाही, सरकारकडून पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक खर्च होत राहिला आणि याबरोबर पोलाद वापरातील वाढ अशीच सुरू राहिली, तर २०२३ पर्यंत आपल्याला ३०० दशलक्ष टन क्षमतेची आवश्यकता भासेल”, असे पौंड्रिक यावेळी म्हणाले.

हेही वाचा>> बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी अतिधोकादायक यादीत; खाद्य सुरक्षा विभागाचा मोठा निर्णय

ते पुढे म्हणाले की, “पोलाद उत्पादनातील नफा हा मात्र चिंतेचा विषय आहे, विशेषतः गेल्या सहा महिन्यांमध्ये, जागतिक स्तरावर उत्पादन वाढल्याने स्टीलच्या किंमती खाली गेल्या आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात भारतातील आयात ४१ टक्क्यांनी वाढली आहे, तर निर्यात ३६ टक्क्यांनी कमी झाली आहे. पोलाद कंपन्यांमधील साठा पातळी ही साधारणपणे १५-१६ दिवसांवरून वाढून ३० दिवसांपर्यंत गेली आहे. ही एक समस्या आहे आणि आम्हाला त्याची पूर्ण जाणीव आहे”, असेही पौंड्रिक यावेळी म्हणाले.

याबरोबरच त्यांनी स्थानिक पोलाद उद्योग वाचवण्यासाठीचे अनेक मार्ग असल्याचेही स्पष्ट केले. ज्यापैकी आयात शुल्क वाढवणे हा एक मार्ग असल्याचे पौंड्रिक म्हणाले.

Story img Loader